Salman Khan Rumoured Girlfriend: 60 व्या वर्षी सलमानचं ठरलं? रुमर्ड गर्लफ्रेंडची सलीम खान यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणते 'तुम्ही माझ्यासाठी...'

Last Updated:

Salman Khan Rumoured Girlfriend Post for Salim Khan: सलमानची रूमर्ड गर्लफ्रेंड यूलिया वंतूर हिने एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे सलमान आणि यूलियाच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

News18
News18
मुंबई: बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षाही खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचे लग्न कधी होणार, या प्रश्नाने चाहते कायम उत्सुक असतात. अशातच, त्याची रूमर्ड गर्लफ्रेंड यूलिया वंतूर (Iulia Vântur) हिने एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे सलमान आणि यूलियाच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

सलीम खान यांच्यासाठी यूलियाची खास पोस्ट

प्रसिद्ध लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री आणि गायिका यूलिया वंतूरने सोशल मीडियावर एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. यूलियाने सलीम खान यांचे अनेक सुंदर फोटो शेअर करत त्यांच्यासाठी खास मेसेज लिहिला आहे. यूलियाने इन्स्टाग्रामवर सलीम खान यांना आपला 'सर्वात आवडता व्यक्ती' म्हटले आहे.
advertisement
यूलियाने लिहिले आहे, "माझे सर्वात प्रिय व्यक्ती सलीम खान यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही माझ्यासाठी पिता, गुरु, मित्र, प्रेरणा, विश्वास आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहात. मी तुमच्यासाठी नेहमी आभारी राहीन. तुमचे हृदय नेहमी प्रेम, आनंद आणि दयाळूपणाने भरलेले राहो. तुम्ही तुमच्या बुद्धीने आणि ताकदीने लोकांना प्रेरित करत राहा. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे."
advertisement
advertisement

खान कुटुंबासह यूलियाचे जवळचे नाते

यूलियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे खान कुटुंबासोबतचे जवळचे नाते स्पष्टपणे दिसून येते. पहिल्या फोटोत यूलिया सलीम खान यांना प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ती सलमान खानचे आई-वडील आणि कुटुंबासोबत पोज देत आहे. तर, चौथ्या फोटोत सलीम खान केक कापताना हसताना दिसत आहेत. यूलिया खान कुटुंबाच्या खूप जवळ आहे आणि ती त्यांच्या घरातील प्रत्येक सण-समारंभात तसेच वाढदिवसाच्या पार्ट्यांमध्ये नेहमी उपस्थित असते.
advertisement

सलमान खानसोबत यूलियाचे संबंध

यूलिया वंतूर आणि सलमान खान यांच्या नात्याबद्दलच्या अफवा बऱ्याच वर्षांपासून आहेत, पण दोघांनीही कधीही याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तरीही ते अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. यूलियाने अनेकदा सांगितले आहे की, सलमान खानने तिला भारतात करिअर बनवण्यासाठी खूप मदत केली. हिंदी गाणी गाण्यासाठी त्यानेच तिला प्रोत्साहन दिले. ती सलमानच्या काही चित्रपटांसाठी देखील गायली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Salman Khan Rumoured Girlfriend: 60 व्या वर्षी सलमानचं ठरलं? रुमर्ड गर्लफ्रेंडची सलीम खान यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणते 'तुम्ही माझ्यासाठी...'
Next Article
advertisement
Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement