Santosh Juvekar: 'आनंद दिघे साहेबांबरोबर...' टेंभी नाका दहीहंडीत संतोष जुवेकरचा जल्लोष; म्हणाला,'ठाणे माझं होम ग्राऊंड'

Last Updated:

Santosh Juvekar: राज्याच्या सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवांपैकी एक असलेल्या ठाण्यातील दिघे साहेबांच्या दहीहंडीत यंदा अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

टेंभी नाका दहीहंडीत संतोष जुवेकरचा जल्लोष
टेंभी नाका दहीहंडीत संतोष जुवेकरचा जल्लोष
मुंबई : राज्याच्या सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवांपैकी एक असलेल्या ठाण्यातील दिघे साहेबांच्या दहीहंडीत यंदा अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. त्यातच मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर याने खास उपस्थिती दर्शवून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात टेंभी नाका येथे आनंद दिघे यांच्या नावाने आयोजित केलेल्या या दहीहंडीला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते. लाखो गोविंदा आणि प्रेक्षकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. अशा उत्साही वातावरणात संतोष जुवेकर मंचावर दाखल होताच, उपस्थितांमध्ये आनंदाची लाट पसरली.
advertisement
अभिनेता संतोष जुवेकर याने यावेळी बोलताना गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या साहसाचे कौतुक केले. 'प्रत्येक वर्षी या दहीहंडी उत्सवाची भव्यता वाढत आहे. दिघे साहेबांच्या नावाने हा उत्सव आयोजित केला जातो, त्यामुळे त्याला एक वेगळे महत्त्व आहे,'
माध्यमांशी बोलताना संतोष जुवेकर म्हणाला, टेंभी नाका माझंच होम ग्राऊंड आहे, माझंच घर आहे. ठाण्यातील पहिला मानाची दहिहंडी आहे ही. या दहीहंडीशी एक वेगळं नातं आहे. दरवर्षी येतो, हा आनंद जल्लोष बघतो, खूप बरं वाटतं. लहान असताना दिघे साहेबांबरोबर आनंद मठीत मुलांसाठी कार्यक्रम असायचे तेव्हा आम्ही कार्यकर्तेही काम करायचे. ठाणे प्रकल्भ, समृद्ध होतंय याचा मला आनंद आहे."
advertisement
दरम्यान, ठाण्याच्या दिघे साहेबांच्या दहीहंडीत अभिनेता संतोष जुवेकरने खास डायलॉगही बोलला. मोरया चित्रपटातील डायलॉग मारत अभिनेता संतोष जुवेकरने गोविंदाचा जोश वाढवला.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Santosh Juvekar: 'आनंद दिघे साहेबांबरोबर...' टेंभी नाका दहीहंडीत संतोष जुवेकरचा जल्लोष; म्हणाला,'ठाणे माझं होम ग्राऊंड'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement