Jyoti Chandekar Passes Away: बालवयात रंगभूमीवर, 200 पुरस्कारांचा मान, अभिनेत्री ज्योती चांदेकरांचा 'हा' गाजलेला चित्रपट पाहिला का?

Last Updated:
Jyoti Chandekar passes away: मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून आपला ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्काच बसला आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
1/7
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून आपला ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्काच बसला आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

advertisement
2/7
16 ऑगस्ट रोजी त्यांचे पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. ज्योती यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

3/7
काही दिवसांपासून त्या पुण्यात उपचार घेत होत्या. त्यांच्या जाण्याने मराठी इंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.'ठरलं तर मग' या मालिकेत त्या 'पूर्णाआजी' ची भूमिका त्या साकारत होत्या. घराघरात पोहोचलेलं हे पात्र आजही प्रेक्षक विसरू शकत नाहीत.

4/7
फक्त 12व्या वर्षी रंगभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या ज्योतींनी तब्बल 200 हून अधिक पुरस्कार पटकावले.‘पुलावत’, ‘सलाम’, ‘ढोलकी’, ‘संजपर्व’, ‘आई तिचा उंबरठा’, ‘आई ढोलकी’, ‘पौलत’ अशा चित्रपटांमध्ये त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या.

5/7
ज्योती चांदेकर या प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत्या. खरी गंमत म्हणजे 2015 मध्ये आई-मुलीला एकाच वेळी पुरस्कार मिळाला होता. ज्योतींनी ‘तिचा उंबरठा’मध्ये आपल्या मुलीच्या सासूची भूमिका साकारली आणि पडद्यावरच नव्हे तर वास्तवातही या आई-मुलीच्या नात्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.

6/7
त्यांच्या जाण्याने सोशल मीडियावर चाहते आणि सहकलाकारांनी श्रद्धांजलीचा वर्षाव केला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने खास पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

7/7
ज्योती चांदेकर या फक्त अभिनेत्री नव्हत्या, तर मराठी घराघरातील
ज्योती चांदेकर या फक्त अभिनेत्री नव्हत्या, तर मराठी घराघरातील "आज्जी" होत्या. त्यांचा मंद हसरा चेहरा, गोड आवाज आणि अभिनयाची जादू मराठी रसिकांच्या मनात कायम राहील.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement