जेवण करताना अचानक बेशुद्ध पडले सतीश शाह, सचिन पिळगांवकर नाही तर या व्यक्तीशी झालेलं शेवटचं बोलणं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sati Shah Last Call : सतीश शाह यांचं 25 ऑक्टोबर रोजी किडनीच्या आजाराने निधन झालं. त्यांचं शेवटचं बोलणं सचिन पिळगांवकर यांच्याशी नाही तर त्यांच्या ऑनस्क्रिन बायकोशी झालं होतं.
अभिनेते सतीश शाह यांचं 25 ऑक्टोबर रोजी निधन झालं. किडनीशी संबंधित आजारानं त्यांचं निधन झालं. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांचे मित्र, सहकलाकार आणि चाहते यांना धक्का बसला. रविवारी मुंबईत अभिनेत्याचा अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांची साराभाई वर्सेस साराभाई मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. त्याचबरोबर जॅकी श्रॉफ, पंकज कपूर, डेव्हिड धवन आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासह सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थिती लावली. अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सतीश शाह यांच्याबरोबर शेवटचं बोलणं झाल्याचं सांगितलं होतं. पण सचिन पिळगांवकर नाही तर सतीश शाह यांचं प्रसिद्ध अभिनेत्रीशी शेवटचं बोलणं झालं होतं.
मृत्यूच्या दोन तास आधी सतीश शाह यांचं त्यांची ऑनस्क्रिन बायको आणि सहकलाकार रत्ना पाठक शाह यांच्याशी बोलणं झालं होतं. तेव्हा ते पूर्णपणे ठीक दिसत होते. 'साराभाई वर्सेस साराभाई'चे निर्माते जेडी मजेठिया यांनी सतीश शाह यांच्या शेवटच्या दिवसाबद्दल सांगितलं. सतीश यांनी त्यांच्या मृत्यूच्या फक्त दोन तास आधी रत्ना पाठक यांच्याशी बोलले. ते खूप चांगले मित्र होते. त्यांना अजूनही विश्वास बसत नाही की सतीश आता आपल्यात नाही.
advertisement
मृत्यूच्या दोन तास रत्ना पाठक यांच्याशी बोलले
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत जेडी मजेठिया म्हणाले, ते आणि सतीश शाह खूप जवळचे मित्र होते. अभिनेत्याने त्यांच्या मृत्यूच्या अगदी आधी फोनवर अनेक जवळच्या मित्रांशी बोलले होते. जेडी म्हणाले, "मला विश्वास बसत नाहीये. तो सकाळी 11 वाजता आतिश कपाडियाशी बोलला. नंतर दुपारी 12:57 वाजता रत्नाजीशी बोलला. त्यानंतर दोन तासांनंतर, मला कळले की तो आता नाही." त्याचबरोबर सतीश शाह यांनी याच वेळेस अभिनेते सचिन पिळगांवकर यांनाही मेसेज केला होता.
advertisement
जेडी असेही म्हणाले की, आम्ही आदल्या दिवशी भेटणार होतो. मी त्यांच्या घराजवळ होतो पण तो थोडा थकला होता. मी त्याला सांगितले की, माझे कुटुंबही त्याला भेटू इच्छित होते. तो माझ्या मुलींवर खूप प्रेम करतो. तो फोनवर सर्वांशी बोलला. माझ्या कुटुंबाला म्हणाला, "बघा मी कसा दिसतोय. मी किती तंदुरुस्त आहे." त्याने मला नंतर परत येण्यास सांगितले, पण नंतर आता कधीच येणार नाहीये.
advertisement
मृत्यूआधी काय घडलं?
सतीश शाह यांचे मॅनेजर रमेश कडातला म्हणाले की, सतीश शाह दुपारी 2:30 च्या सुमारास जेवण करताना अचानक बेशुद्ध पडले. त्यांनी ताबडतोब अँम्बुलन्स बोलावली. पण ती यायला अर्धा तास लागला. रुग्णालयात गेल्यानंतर सतीश शाह यांना मृत घोषित करण्यात आलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 27, 2025 10:40 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
जेवण करताना अचानक बेशुद्ध पडले सतीश शाह, सचिन पिळगांवकर नाही तर या व्यक्तीशी झालेलं शेवटचं बोलणं


