Shahrukh Khan Birthday: किंग खानचा वाढदिवस, पण मन्नतबाहेर शुकशुकाट, यंदा असं काय घडलं?

Last Updated:

Shahrukh Khan Birthday: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आज 2 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. शाहरुखचा वाढदिवस म्हटल्यावर एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. प्रत्येक वर्षी आपल्या आवडत्या शाहरुखला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होते.


किंग खानचा वाढदिवस, पण मन्नतबाहेर शुकशुकाट
किंग खानचा वाढदिवस, पण मन्नतबाहेर शुकशुकाट
मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आज 2 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. शाहरुखचा वाढदिवस म्हटल्यावर एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. प्रत्येक वर्षी आपल्या आवडत्या शाहरुखला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होते. शाहरुखचा बंगला मन्नत बाहेर लोक त्याची एक झलक पाहण्यासाठी दूरवरून येतात. शाहरुखही आपल्या चाहत्यांना नाराज करत नाही आणि मन्नत बाहेर येऊन चाहत्यांना भेटतो. मात्र यंदा काही भलतंच घडलं आहे. शाहरुखच्या मन्नत बाहेर चक्क शुकशुकाट आहे. भरपूर शांतता आहे. मात्र नेमकं काय घडलं?
शाहरुख खानच्या वाढदिवशी त्याचे हजारो-लाखो चाहते मन्नत बाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी तासनतास उभे असतात. वाढदिवशी आपल्या लाडक्या शाहरुखला बर्थ डे विश करण्यासाठी लोक लांबून येतात. मात्र यंदा मन्नत बाहेर तो आवाज नाहीये, ती गर्दी नाहीये. मन्नत बाहेर एकदम शांतता, शुकशुकाट दिसतोय. पण असं का? काय कारण आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, मन्नत बाहेर मोठी सुरक्षा आहे. सुरक्षेच्या प्रश्नामुळे मन्नतबाहेरील गर्दी हटवण्यात आली आहे. बाब सिद्दीकींच्या हत्येनंतर पोलीस अधिक अलर्ट झाली असून कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही. त्यामुळे यंदा शाहरुख चाहत्यांना आपली झलक दाखवणार नसल्याचं म्हटलं जातंय.
advertisement
advertisement
शाहरुखच्या मन्नत बाहेर एक किलोमीटर पर्यंत सुरक्षा असून चाहत्यांची गर्दी हटवली आहे. त्यामुळे आता किंग खान चाहत्यांना कसं भेटणार आणि कशी एक झलक देणार या चिंतेत चाहते आहेत. अनेक लोक दूरवरून येऊन थांबले आहेत. मात्र सुरक्षा व्यवस्थेमुळे ते मन्नत बाहेर जाऊ शकत नाहीत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Shahrukh Khan Birthday: किंग खानचा वाढदिवस, पण मन्नतबाहेर शुकशुकाट, यंदा असं काय घडलं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement