राजपाल यादवनंतर अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत, पोलिसांत गुन्हा दाखल, नेमकं झालं काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता राजपाल यादव चेक बाऊसिंग प्रकरणात जेलमध्ये आहे. अशातच अभिनेता श्रेयस तळपदे देखील अडचणीत आला आहे. श्रेयस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय आहे?.
बॉलिवूड स्टार्सच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. राजपाल यादव तिहार तुरुंगात असताना आता दुसरीकडे अभिनेता श्रेयस तळपदेही अडचणीत आला आहे. श्रेयस तळपदेसह 12 जणांविरुद्ध कारवाई केली आहे. सगळ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गुंतवणूकदाराच्या तक्रारीवरून न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध तपास सुरू केला आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात.
हे प्रकरण मैनपुरीतील भोगाव पोलिस स्टेशन परिसरातील मोहल्ला मिश्राणा येथील आहे. एका तक्रारदाराने न्यायालयात अर्ज दाखल केला होता की श्रेयस तळपदे आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईतील एका कथित बँक शाखेद्वारे गावकरी आणि शहरवासीयांना मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवलं. त्यांना मोठ्या नफ्याचं आश्वासन दिलंय परंतु गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांचे लाखो रुपये वारंवार विनंती करूनही मिळाले नाहीत तेव्हा हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं.
advertisement
न्यायालयाच्या निर्देशानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केलाय. इतका पैसा कुठून आला आणि कुठे गेला, कथित मुंबई बँकेच्या शाखेची सत्यता आणि आरोपींची चौकशी पोलीस करत आहेत.
advertisement
श्रेयस तळपदे यांनी अद्याप या नवीन प्रकरणात भाष्य केलेले नाही. पोलीस तपास सुरू आहे आणि आरोपींवर फसवणूक, गुन्हेगारी विश्वासघात इत्यादी कलमांखाली कारवाई केली जाऊ शकते. श्रेयस तळपदेचं नाव गुंतवणूक घोटाळ्यात येण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षीपासून लोणी अर्बन मल्टी-स्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये त्यांचे नाव आलं आहे. तो या सोसायटी ब्रँड अॅम्बेसेडर होता.
advertisement
On February 10, the Bhogaon police station in Mainpuri registered a case of fraud against 12 others, including film actor Shreyas Talpade. A resident of Mohalla Mishrana in Bhogaon has accused the film star and other associates of defrauding him of lakhs of rupees under the guise… pic.twitter.com/yXDmQWHAtB
— ANI (@ANI) February 11, 2026
advertisement
बागपत 5 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरण
ऑक्टोबर 2025 मध्ये बागपत पोलिसांनी लोणी अर्बन मल्टी-स्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीशी संबंधित गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यासह 22 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. 500 हून अधिक गुंतवणूकदारांनी 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याचा आरोप केला.
सीबीआय तपास
नोव्हेंबर 2025 मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने त्याच सोसायटीशी संबंधित सुमारे 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यासह 46 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सीबीआयने उत्तराखंडमध्ये दाखल केलेल्या 18 एफआयआर एकत्रित केल्या आणि घोटाळ्याची चौकशी सुरू केली.
advertisement
या प्रकरणांमध्ये आरोप असे आहेत की, श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ हे एका कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर होते ज्यांनी गुंतवणूकदारांना पाच वर्षांत त्यांचे पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. कंपनीने 27 नोव्हेंबर 202 रोजी त्यांचे व्यवहार सॉफ्टवेअर बंद केले आणि कंपनीचे अधिकारी दुबईला पळून गेल्याचे वृत्त देखील आले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 12:20 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
राजपाल यादवनंतर अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत, पोलिसांत गुन्हा दाखल, नेमकं झालं काय?






