एकही पैसा खर्च न करता सिद्धार्थ जाधवच्या घरी नवी कोरी कार; म्हणाला, अभिजीत सावंतला...
- Published by:Minal Gurav
Last Updated:
नवी कार घरी येताच सिद्धार्थ प्रचंड खुश असल्याचं पाहायला मिळालं. . ही कार त्याला एकही पैसा न देता कशी मिळाली हे देखील त्यानं व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
मुंबई : आयुष्यात असे क्षण फार कमी वेळा येतात जेव्हा आपल्याला हवी असलेली गोष्ट आपण न मागता आपल्याला मिळते. असंच काहीस झालं आहे महाराष्ट्राचा धडाकेबाज अभिनेता सिद्धार्थ जाधवबरोबर. सिद्धार्थ जाधवने न मागता, एकही पैसा खर्च न करता त्याला नवी कोरी कार मिळाली आहे. सिद्धार्थनं नुकताच कारचा व्हिडीओ शेअर केला आहे. नवी कार घरी येताच सिद्धार्थ प्रचंड खुश असल्याचं पाहायला मिळालं. ही कार त्याला एकही पैसा न देता कशी मिळाली हे देखील त्यानं व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
सिद्धार्थ जाधवच्या घरी मारूती सुझूकीची कार आली आहे. सिद्धार्थला ही कार गिफ्ट म्हणून मिळाली आहे. सिद्धार्थनं त्याच्या कामानं महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच पण त्याच्या कामामुळे स्टार प्रवाह वाहिन देखील त्याच्यावर खुश झाली. टेलिव्हिजन शो उत्तमरित्या होस्ट केल्यामुळे सिद्धार्थला ही कार गिफ्ट देण्यात आली आहे.
advertisement
कार घरी येताच सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबियांनी कारची पूजा केली. सिद्धार्थच्या पत्नीनं कारची पूजा केली. मुलींना कारबरोबर केक देखील कटींग केलं. स्टार प्रवाहवरील आता होऊ देत धिंगाणा हा शो सिद्धार्थ जाधव होस्ट करत होता. या कार्यक्रमात धिंगाणेबाज परफार्मर म्हणून सिद्धार्थला ही कार गिफ्ट करण्यात आली.
advertisement
सिद्धार्थनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "न मागताच मिळाले आज खूप काही. थँक्यू. मराठी टेलिव्हीजन History मधला मी पहिला कलाकार असेन ज्याला बक्षीस म्हणून कार मिळाली आहे. खूप भारी फिलिंग. कारण खूप वर्षांपूर्वी "इंडियन आयडॉल" च्या फायनल नंतर अभिजित सावंतला होंडा सिटी मिळाली होती अन् ते बघून खूप आनंद झाला होता. आणि आज त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या नं 1 चॅनेल वर "आता होऊ दे धिंगाणा" सारखा शो होस्ट करायला मिळणं आणि त्याच शो वर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करणं आणि त्याची जी काय पोचपावती म्हणून, धिंगाणेबाज परफॉर्मर म्हणून मला ही गाडी बक्षीस म्हणून मिळणं हे सगळंच स्वप्नवत आहे. खुप मस्त वाटतंय".
advertisement
सिद्धार्थला मिळालेलं हे गिफ्ट पाहून सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर सिद्धार्थला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 17, 2024 12:27 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
एकही पैसा खर्च न करता सिद्धार्थ जाधवच्या घरी नवी कोरी कार; म्हणाला, अभिजीत सावंतला...






