Video: आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा गायक, सात पिढ्यांपासून जपली लोककलेची परंपरा

Last Updated:

महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घातली. पण या गाण्यांच्या गायकाबद्दल माहितीये का?

+
Video:

Video: आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा गायक, सात पिढ्यांपासून जपली लोककलेची परंपरा

जालना, 2 सप्टेंबर: काळाच्या ओघात अनेक लोककला, लोकपरंपरा नाहीशा झाल्या आहेत. तर काही अखेरच्या घटका मोजत आहेत. तमाशा, गोंधळी, नंदीबैल, वासुदेव अशा एक ना अनेक लोककला आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी मनोरंजनाचे साधन नसल्याने या कलांना प्रेक्षक व सर्वसामान्य जनता यांचं प्रेम मिळायचं. यातूनच या कलावंताचा उदरणीर्वाह व्हायचा. मात्र हल्ली परिस्थिती बदलली असल्याने या कलाकारांची देखील हेळसांड होत आहे. जालना जिल्ह्यातील उगले कुटुंब मागील सात पिढ्यांपासून लोकगीते गाण्याची परंपरा जोपासत आहे. यामध्ये भारुड, पोवाडे, लोकगीते आदी गाणी गायली जातात. पुढे त्यांच्या मुलांनी देखील हे बाळकडू जोपासलं आहे.
महाराष्ट्र शाहीरमध्ये तब्बल 11 गाणी
काही दिवसांपूर्वी आलेल्या महाराष्ट्र शाहीर या सिनेमात तब्बल 11 गाणी रामानंद उगले यांनी गायली आहेत. तर पांडू या सिनेमातील एक गीत त्यांनी गायले आहे. त्याच बरोबर टाच मारुनी घोड्याला, गाडी घुंगराची अशी गाजलेली लोकगीते आणि असंख्य पोवाडे गायले आहेत. झी युवा वाहिनीवरील महाराष्ट्र सम्राट या कार्यक्रमात सहभाग घेऊन रामानंद उगले यांनी उपविजेतेपद मिळविले. तेव्हा पासून महाराष्ट्रातील घराघरात ते पोहचले. सध्या त्यांच्या युट्युब चॅनलवर अनेक लोकगीतांची निर्मिती करतात. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
सात पिढ्यांपासून लोककलेचा वारसा
मागील सात पिढ्यांपासून आमचे कुटुंब या क्षेत्रात आहे. त्यामुळे लोककलेचं बाळकडू घरातूनच मिळालं. आमच्या वडिलांना आम्ही या क्षेत्रात येऊ नये असं वाटायचं. शिक्षण घेऊन चांगली नोकरी करावी असा त्यांचा आग्रह होता. मात्र आम्ही सगळेच या गोष्टी मध्ये तरबेज असल्याने आणि लोककला अंगात भिणल्याने आम्ही या क्षेत्रात येण्यापासून स्वतः ला रोखू शकले नाही, असं रामानंद उगले सांगतात.
advertisement
बंधू कल्याण करतात गीतलेखन
रामानंद यांचे मोठे बंधू कल्याण उगले हे गीतलेखन काम करतात. तसेच काही वर्षांपासून शहरातील एका महाविद्यालयात लोककलेचा प्रशिक्षण देखील ते देत आहेत. सध्या त्यांच्याकडे 30 विद्यार्थी शिकत असून अतिशय नाममात्र शुल्क यासाठी आकारले जाते.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Video: आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा गायक, सात पिढ्यांपासून जपली लोककलेची परंपरा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement