दिव्यांग असूनही मानली नाही हार, आदित्यनं जे करून दाखवलं ते पाहून कराल सॅल्युट, Video

Last Updated:

शारीरिक विकलांगतेमुळं धड नीट बसताही येत नाही. पण आदित्य घुले या दिव्यांग तरुणानं आपल्या बुद्धीच्या बळावर अनेकांना मात दिलीय. प्रेरणादायी कहाणी...

+
दिव्यांग

दिव्यांग असूनही मानली नाही हार, आदित्यनं जे करुव दाखवलं ते पाहून कराल सॅल्युट

जालना, 31 ऑगस्ट: क्रीडा क्षेत्रात अनेक खेळाडू आपल्या देशाचे नाव मोठं करत आहेत. क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळांना देखील आता प्रोत्साहन मिळत आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक बुद्धिबळ विश्वचषकात प्रज्ञानंद याने उपविजेता पद पटकावले आहे. जालना शहरातील एक दिव्यांग बुद्धिबळ पटू देखील आपल्या शारीरिक विकलांगतेला अडथळा न मानता या खेळत प्रावीण्य मिळवत आहे. मागील पाच वर्षांपासून तो बुद्धिबळ खेळत असून अनेक पुरस्कार त्याने यात मिळवले आहेत.
कशी झाली सुरुवात?
या दिव्यांग बुद्धिबळ पटूचे नाव आदित्य आसाराम घुले आहे. बारावीत शिकणारा आदित्यला अनुवांशिक आजारामुळे दिव्यांगत्व आल्यामुळे आदित्यला जागेवरून उठता येत नाही. व्हीलचेअरच्या आधारावरच तो आज बुद्धीबळात पारंगत झाला आहे. विविध स्पर्धांमध्ये त्याने चमकदार कामगिरी करीत आई-वडिलांसोबतच स्वतःच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलविले आहेत. 
दीड वर्षापर्यंत बोलता येत नव्हतं, दुसऱ्याच वर्षी केला वर्ल्ड रेकॉर्ड! ठाण्याच्या समर्थची भन्नाट कामगिरी
आदित्य हा शाळेत असताना त्याला वेगवेगळ्या खेळत आवड निर्माण होऊ लागली मात्र दिव्यांग असल्याने प्रत्येक खेळ तो खेळू शकत नव्हता. तेव्हा त्याने त्याला जमेल अशा बुद्धिबळ खेळत प्रावीण्य मिळवण्याचे ठरवले. यासाठी प्रशिक्षक देखील त्याने स्वतः शोधले. बेसिक गोष्टी पासून सुरुवात झाल्यानंतर आता तो या खेळात तरबेज झाला आहे. दिव्यांग कॅटेगरीमध्ये त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. आतापर्यंत तो मुंबई, उदयपूर, त्रीची यासारख्या शहारातील स्पर्धामध्ये खेळला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत त्याने चौथा क्रमांक पटकावला आहे.
advertisement
शाळेत असताना मी पहिल्यांदा बुद्धिबळ खेळ पहिला. त्यानंतर मला यात आवड निर्माण झाली. मग मी प्रशिक्षक यांचा शोध घेतला. 2018 पासून मी हा खेळ खेळत आहे. आतापर्यंत देशातील अनेक शहरात मी अनेक प्रकारात खेळलो आहे. विश्वनाथन आनंद हा माझा आदर्श असून राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचे माझे स्वप्न असल्याचे आदित्य घुले याने सांगितले. तर भविष्यात दिव्यांगांसाठीच्या असलेल्या बुध्दीबळ स्पर्धेत आदित्य हा निश्चितपणे चमकदार कामगिरी करेल असा विश्वास प्रशिक्षक सतीश ठाकुर आणि त्यांचे वडील आसाराम घुले यांनी व्यक्त केलाय. 
advertisement
दीड वर्षापर्यंत बोलता येत नव्हतं, दुसऱ्याच वर्षी केला वर्ल्ड रेकॉर्ड! ठाण्याच्या समर्थची भन्नाट कामगिरी
परिस्थिती कशीही असो तुमच्या मनात जिद्द असल्यास कुठल्याही अडचणीवर मात करणे शक्य होते. हेच बुध्दीबळपटू आदित्यने दाखवून दिले आहे. आत्मविश्वास दांडगा असेल तर शरीराने कितीही साथ सोडू द्या आयुष्यातील लक्ष्य सहज गाठता येते हे आदित्य याने सिद्ध केलंय.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
दिव्यांग असूनही मानली नाही हार, आदित्यनं जे करून दाखवलं ते पाहून कराल सॅल्युट, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement