दीड वर्षापर्यंत बोलता येत नव्हतं, दुसऱ्याच वर्षी केला वर्ल्ड रेकॉर्ड! ठाण्याच्या समर्थची भन्नाट कामगिरी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
समर्थला दीड वर्षांपर्यंत बोलता येत नव्हतं. त्याच्या आई-वडिलांना या गोष्टीचं टेन्शन आलं होतं.
ठाणे, 29 ऑगस्ट : काहींचे वय हे फक्त आकडा असतो. त्यांचे कार्य पाहून संपूर्ण जगाला आश्चर्य वाटतं. मुळचा ठाण्याचा आणि सध्या मलेशियात राहणाऱ्या दोन वर्षांच्या चिमुरड्यानंही असाच एक रेकॉर्ड केलाय. ज्या वयात मुलांना अक्षरओळखही पुरेशी नसते. सर्व गोष्टींसाठी मोठ्यांवर अवलंबून राहावं लागतं, त्यावयात त्यानं केलेल्या रेकॉर्डची दखल जगानं घेतलीय.
समर्थ कारंडे असं या चिमुरड्याचं नाव आहे. तो सध्या 2 वर्ष 11 महिन्यांचा आहे. तो या लहान वयात फक्त 7 मिनिटांमध्ये जवळपास 401 इंग्रजीचे शब्द वाचतो. त्याच्या या हुशारीची दखल कलाम वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतलीय.
advertisement
समर्थ बोलायचाच नाही...
समर्थ दीड वर्षांचा झाला तरी बोलत नव्हता. त्यामुळे आम्हाला खूप टेन्शन आलं होतं. आम्ही त्याला आमच्यासोबत बाहेर नेत असू. त्यावेळी तो हळू-हळू इंग्रजीमधले अक्षरं वाचू लागला. त्यानंतर त्याला वाचनाची गोडी आहे हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे आम्ही काही लहान पुस्तकं त्याला आणून दिली. त्याला वाचणाची गोडी लागली, असे त्याचे वडिल तुषार कारंडे यांनी सांगितलं.
advertisement
'आम्हाला नातेवाईकाकडून कलाम वर्ल्ड रेकॉर्डची माहिती मिळाली. आम्ही त्याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर कमीत कमी मिनिटात जास्तीत जास्त शब्द वाचण्याच्या विभागात समर्थ बसतो, हे आम्हाला समजले. यापूर्वी समर्थच्या वयाच्या एका मुलानं 14 मिनिटात 380 इंग्रजी शब्द वाचले होते. समर्थनं 7 मिनिटात 401 शब्द वाचत त्या रेकॉर्ड ब्रेक केला,' असं त्यांनी सांगितलं. समर्थच्या या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झालीय.
advertisement
समर्थचे वडिल तुषार आणि आई प्रियांका कारंडे हे ठाणे जिल्ह्यातल्या कळवाचे रहिवाशी असून गेल्या आठ वर्षांपासून मलेशियात त्यांचं वास्तव्य आहे. समर्थला जे काही करायचं आहे, त्याला आम्ही प्रोत्साहन देणार आहोत , अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
August 29, 2023 1:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
दीड वर्षापर्यंत बोलता येत नव्हतं, दुसऱ्याच वर्षी केला वर्ल्ड रेकॉर्ड! ठाण्याच्या समर्थची भन्नाट कामगिरी