'WWEच्या रेसलर सारखा मारायचा, पैसा-घर सगळं लुबाडलं'; प्रसिद्ध गायिकेचे होणाऱ्या नवऱ्यावर गंभीर आरोप
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Singer Alleges to Fiance : प्रसिद्ध गायिकेचं लग्न होण्याआधीच आयुष्य उद्धवस्त झाल्याच्या परिस्थितीत आहे. होणाऱ्या नवऱ्यावर तिनं मारहाणीचे गंभीर आरोप केलेत.
मुंबई : निक्की हत्याकांडाची देशभर चर्चा सुरू असताना दुसरीकडे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. गायिकेनं तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत. त्याने तिला फक्त मारहाण नाही तर तिचे पैसेही लुबाडल्याचा आरोप तिनं केला आहे. चेन्नई उच्च न्यायालयाचे वकील शुनमुगराज यांनी ही माहिती दिली आहे. तो मला WWEच्या रेसलरसारखा मारायचा असंही गायिकेनं सांगितलं आहे. कोण आहे ही गायिका? नेमकं काय घडलं आहे?
सुचित्रा या साऊथ गायिकेबरोबर हा प्रकार घडला आहे. ती गायिका आणि एक्स रेडिओ जॉकी आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने होणाऱ्या नवऱ्यावर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे.
advertisement
होणाऱ्या नवऱ्यावर आरोप
या व्हिडिओमध्ये सुचित्राने सांगितले की तिचा मंगेतर तिला WWE च्या रेसलरसारखा मारायचा. त्याच्या बुटांनी मारहाण करायचा. हा व्हिडिओ शेअर करताना तिने एक लांबलचक कॅप्शन देखील लिहिले आहे. तिनं तिच्याबरोबर काय घडलं हे सांगितलं. ती म्हणाली की, तिला खूप त्रास सहन करावा लागला आहे. तिने आता त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
शुणमुगराज असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. 5 वर्षांपासून ती त्याला ओळखते. दोघे एन्गेज होते. व्हिडिओ शेअर करताना सुचित्राने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "हे कर्म काहीही असो, मी एक महिला म्हणून हार मानणार नाही. या शुणमुगराजने माझे कष्टाचे पैसे चोरले. जे मी गाण्यांद्वारे मोठ्या कष्टाने कमावले. गाणे कठीण नव्हते. कठीण गोष्ट होती. व्यावसायिक वृत्ती राखणे, छेडछाडीकडे दुर्लक्ष करणे, 'काऊच'पासून दूर राहणे आणि सुरक्षित राहणे."
advertisement
advertisement
तिनं पुढे म्हटलंय, "हिंसक माणूस शारीरिकदृष्ट्या जवळ असतानाच भयानक वाटतो. आता मी शुणमुगराजच्या शारीरिक क्रोधापासून दूर असल्याने मी त्याला खाली आणण्यासाठी माझ्या क्षमतेनुसार प्रत्येक डिजिटल साधन (मुख्यमंत्र्यांकडे तक्रार आज ईमेलवर आहे) वापरू शकते आणि वापरेन. मी स्वतः सांगितल्याशिवाय तुम्हाला याबद्दल माहिती मिळणार नाही. आज मला जाणवले की मी माझ्या प्रत्येक गाण्यावर (मे मसम 98'इलसह) शुणमुगराजपेक्षा जास्त प्रेम केलं आहे आणि करत राहीन. तो एक एक पैसा परत करेपर्यंत मी त्याचा पाठलाग करेन. चेन्नई उच्च न्यायालयाचे बेरोजगार आणि आळशी वकील शुणमुगराज के. त्याला त्या दिवसाचा पश्चाताप होईल जेव्हा त्याने माझ्याशी पंगा घ्यायचा विचार केला."
advertisement
त्याने सर्वस्व हिरावून घेतले
सुचित्राने तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर तिच्या चेन्नईतील घरातून हाकलून लावल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर तिला काही महिन्यांपूर्वी नोकरी मिळाली आणि ती मुंबईत आली. याआधीही होणाऱ्या नवऱ्याने तिच्यावर हल्ला करण्याचे संकेत दिले होते असं तिने सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2025 11:05 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'WWEच्या रेसलर सारखा मारायचा, पैसा-घर सगळं लुबाडलं'; प्रसिद्ध गायिकेचे होणाऱ्या नवऱ्यावर गंभीर आरोप