advertisement

Akshaya Naik : 'मी 11 वर्ष एका कमिटेड रिलेशनमध्ये', अक्षया नाईकने दिली प्रेमाची कबुली, VIDEO

Last Updated:

Akshaya Naik Relationship : अभिनेत्री अक्षया नाईकने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने तिच्या 11 वर्षांच्या रिलेशनशिपबद्दल पहिल्यांदा सांगितलं आहे. कोण आहे अक्षया नाईकचं कॉन्स्टंट प्रेम?

News18
News18
मुंबई : सुंदर मनामध्ये भरील या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली, मराठी व हिंदी टेलिव्हिजनवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अक्षया नाईक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नेहमीच वेगळ्या आणि मनापासूनच्या पोस्टमुळे चर्चेत राहणारी अक्षया या वेळी एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या 11 वर्षांच्या 'कमिटेड रिलेशनशिप' बद्दल उघडपणे सांगितले आहे.

व्हिडीओतून दिली रिलेशनशिपची बातमी

अक्षयाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत ती म्हणते, "बऱ्याच जणांना माहिती नाही पण मी गेली 11 वर्ष एका कमिटेड रिलेशनमध्ये आहे. आणि मी ही न्यूज आता ब्रेक करत आहे." तिच्या या वाक्यांमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. काही क्षणांनंतर तिने खुलासा केला की ती रिलेशनशिप तिच्या स्कूटीसोबत आहे आणि तिच्या स्कूटीचं नाव आहे 'मिस्टर रँचो'.
advertisement

मिस्टर रँचो - कॉन्स्टंट प्रेम

अक्षया पुढे म्हणते, "आज खूप महिन्यांनी आमची भेट झाली आहे. आम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. जास्त वेळ न घालवता मला माझ्या कॉन्स्टंटसोबत वेळ घालवू द्या." या मजेशीर पण भावनिक व्हिडीओला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तिच्या स्कूटीविषयीचा हा प्रेमभाव अनेकांना भावला आहे.
advertisement
advertisement

अक्षया नाईकचं करिअर

अक्षया नाईकने हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेत 'अनन्या'ची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला ओळख मिळाली. त्यानंतर ती 'पिंजरा खूबसूरती का' मालिकेत दिसली. त्यानंतर सुंदरा मनामध्ये भरली या मराठी मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली.  तिच्या सहज अभिनयशैलीमुळे ती प्रेक्षकांची लाडकी बनली.
advertisement
या व्हिडीओतून अक्षयानं प्रेम, हळवेपणा आणि विनोद यांचा उत्तम मिलाफ साधला आहे. तिचा 'मिस्टर रँचो'सोबतचा नातेसंबंध चाहत्यांना भावला. अनेकांनी तिच्या पोस्टवर प्रेमळ प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Akshaya Naik : 'मी 11 वर्ष एका कमिटेड रिलेशनमध्ये', अक्षया नाईकने दिली प्रेमाची कबुली, VIDEO
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement