advertisement

Saif-Kareena Divorce: हल्ल्यानंतर सैफ-करीनामधील नात बिघडलं, जोडपं घेणार घटस्फोट? नव्या पोस्टमुळे खळबळ

Last Updated:

Saif Ali Khan - Kareena Kapoor Divorce: नुकतंच अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत.

नुकतंच अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत.
नुकतंच अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत.
Saif-Kareena Divorce: बॉलिवूडमध्ये सध्या अनेक सेलिब्रिटी कपल्सच्या नातेसंबंधांबाबत चर्चांना उधाण आलं आहे. नुकतंच अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. या चर्चांना अधिक जोर मिळण्याचे कारण म्हणजे करीनाने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट, ज्यामध्ये तिने लग्न, घटस्फोट, पालकत्व आणि चिंता यासारख्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे.

करीनाच्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम

करीना कपूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तिचा पती आणि अभिनेता सैफ अली खानवर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या घटनेनंतर करीना मीडियापासून दूर असल्याचं पाहायला मिळालं. पण आता तिने शेअर केलेल्या पोस्टमुळे नवीन चर्चांना उधाण आलं आहे. करीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं की, "लग्न, घटस्फोट, चिंता, बाळंतपण, प्रिय व्यक्तीचा मृत्यू आणि पालकत्व – या गोष्टी तुमच्यासोबत घडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्या कधीच समजणार नाहीत. जीवनात काहीच गृहीत धरू नका, कारण अनुभवच तुम्हाला खऱ्या जगण्याची शिकवण देतो."
advertisement
या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. काहींनी तिला घटस्फोटाचा इशारा तर दिला आहे, तर काहींनी ही पोस्ट सैफवर झालेल्या हल्ल्यानंतरच्या तिच्या भावनांची अभिव्यक्ती असल्याचं म्हटलं आहे.
advertisement

घटस्फोटाच्या चर्चा खरी की अफवा?

करीना आणि सैफ यांचा प्रेमविवाह २०१२ मध्ये झाला होता आणि ते दोघे दोन मुलांचे पालक आहेत - तैमूर आणि जेह. त्यांचं नातं नेहमीच बॉलिवूडमध्ये आदर्श मानलं गेलं आहे. त्यामुळे या घटस्फोटाच्या चर्चांनी चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण केला आहे.
मात्र, करीनाच्या या पोस्टचा खरंच सैफसोबतच्या नात्यावर काही परिणाम आहे का? की ही केवळ तिच्या जीवनात घडलेल्या अलीकडील घटनांमुळे आलेली भावना आहे? याचा खुलासा अजून झालेला नाही. तरीही, सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा झाला असून चाहते सैफ आणि करीनाच्या अधिकृत प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत.
advertisement
करीनाची पोस्ट फक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित आहे की ती संपूर्ण समाजासाठी एक संदेश आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. पण तिच्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे आणि या चर्चांना कोणताही आधार आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Saif-Kareena Divorce: हल्ल्यानंतर सैफ-करीनामधील नात बिघडलं, जोडपं घेणार घटस्फोट? नव्या पोस्टमुळे खळबळ
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement