अपघातानंतर उर्मिला कानेटकरचा दमदार कमबॅक! सस्पेन्स-थ्रिलर नाटकात झळकणार
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Urmila Kanetkar kothare come back : उर्मिला कानेटकर अपघातानंतर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. सस्पेन्स थ्रिलर कलाकृतीमध्ये उर्मिला दिसणार आहे.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर हिचा काही महिन्यांआधी अपघात झाला होता. उर्मिलाच्या कारने दोन मेट्रो मजुरांना धडक दिली होती. यात एका मजुराचा मृत्यू झाला. तर उर्मिला आणि तिच्या कार चालकाला गंभीर दुखापत झाली. उर्मिला उपचारांसाठी काही दिवस रुग्णालयात होती. उपचार घेतल्यानंतर उर्मिला सक्तीच्या विश्रांतीवर होती. दरम्यान कार अपघातानंतर उर्मिल कानेटकर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. उर्मिला नव्या मराठी नाटकातून रंगभूमीवर दिसणार आहे.
कॉफीची चाहूल वेगळीच! मग ती थंड असो वा गरम. कॉफीचे चाहते कमी नाहीत. घरात कॉफीचा सुगंध दरवळतो तसाच आता रंगभूमीवरही दरवळणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर हे 'फिल्टर कॉफी' हे नाटक घेऊन येत आहेत. अद्वैत आणि अश्वमी थिएटर्स प्रकाशित आणि महेश वामन मांजरेकर सादर करत असलेली ही 'फिल्टर कॉफी' 6 एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे. या नाटकात उर्मिला कोठारे प्रमुख भूमिकेत आहे.
advertisement
'फिल्टर कॉफी' - एक सस्पेन्स थ्रिलर
'फिल्टर कॉफी' या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले आहे. या नाटकाचे निर्माते दिलीप माधव जगताप असून सहनिर्माते राहुल भंडारे आहेत. 'फिल्टर कॉफी' मध्ये विराजस कुलकर्णी, विक्रम गायकवाड, कुणाल मेश्राम, अंकिता लांडे आणि उर्मिला कानिटकर यांच्या भूमिका आहेत.
advertisement

या निमित्ताने बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, "1992 साली मला हे नाटक करायचे होते, पण तेव्हा शक्य झाले नाही. आता मी हे नाटक घेऊन येत आहे आणि ते स्वतःच दिग्दर्शित करत आहे. कॉफीच्या गडद रंगाप्रमाणे या नाटकाचाही गडद शेड प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल." हे नाटक सस्पेन्स थ्रिलर असून मराठी नाट्य रसिकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
advertisement
कलाकारांच्या भूमिका आणि अनुभव
अभिनेत्री उर्मिला कानिटकर म्हणाली, "ही माझी पहिलीच नाट्यकृती आहे आणि महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या नाटकामुळे माझी नाटक करण्याची इच्छा पूर्ण झाली."

अभिनेता विराजस कुलकर्णी म्हणाला, "मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर नाटके येत आहेत आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. रंगभूमीमुळे मराठी सिनेसृष्टीला वेगळी ओळख मिळतेय. नाटक हे नेहमीच दिग्दर्शकाचे मानले जाते आणि प्रेक्षक दिग्दर्शकाच्या नावामुळे नाटक पाहायला येतात. महेश मांजरेकर यांचे नाव त्यात अग्रेसर आहे. त्यांच्या कलाकृती पाहत मी मोठा झालो आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मी कधीच सोडू शकत नव्हतो."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2025 11:51 AM IST







