VIDEO : 'डिलिव्हरी बॉय' पाहताना महिलेला अश्रू अनावर; अभिनेत्रीनं मिठी मारत केलं असं काही
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाच्या प्रीमियर नाइटचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यात हा चित्रपट पाहून एका महिलेला अश्रू अनावर झाले. पण या त्यानंतर अभिनेत्रीनं केलेल्या कृतीनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं. पण या चित्रपटातील कोणत्या गोष्टीमुळं महिला इतकी भावुक झाली जाणून घ्या.
मुंबई : सध्या एका मराठी चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे तो म्हणजे 'डिलिव्हरी बॉय'. पृथ्वीक प्रताप आणि प्रथमेश परब यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा 9 फेब्रुवारीला रिलीज झाला. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता सिनेमाला देखील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. आता चित्रपटाच्या प्रीमियर नाइटचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यात हा चित्रपट पाहून एका महिलेला अश्रू अनावर झाले. पण या त्यानंतर अभिनेत्रीनं केलेल्या कृतीनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं. पण या चित्रपटातील कोणत्या गोष्टीमुळं महिला इतकी भावुक झाली जाणून घ्या.
लुसिया एंटरटेनमेंट प्रॅाडक्शन निर्मित, सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून विकेण्डला अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चित्रपटाची टीम चित्रपटगृहांना सध्या भेटही देत आहे. यादरम्यानच घडलेल्या एका घटनेची सध्या चर्चा होत आहे. तसंच त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
advertisement
प्रसिद्ध अभिनेत्रीनं गुपचूप बांधली लग्नगाठ? लेकीला नवरीच्या रूपात पाहून आईला अश्रू अनावर
नुकतच 'डिलिव्हरी बॉय' चित्रपटात प्रथमेश आणि पृथ्वीक सोबत मुख्य भूमिकेत दिसलेली अभिनेत्री अंकिता लांडे पाटील हिने चित्रपटगृहाला भेट देत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी चित्रपटाची कथा त्यांना खूपच भावली असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पण काही महिला चित्रपट पाहून खूपच भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. महिलांना चित्रपट पाहून अक्षरशः अश्रू अनावर झाले. अनेक महिलांनी यावेळी आपले अनुभव शेअर केले. हे अनुभव शेअर करताना अनेकींच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं.
advertisement
याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. व्हिडिओत महिला 'डिलिव्हरी बॉय' हा चित्रपट पाहताना भावुक झालेली पाहायला मिळाला. यावेळी अभिनेत्री अंकिता लांडे पाटील हिने पुढे जात त्या महिलेला सावरलं आणि तिचा अनुभव जाणून घेतला.
'डिलिव्हरी बॉय' चित्रपट पाहताना महिलांना अश्रू अनावर; पाहा तो क्षण #EntertainmentNews #marathimovies pic.twitter.com/M70CM0jzHS
— News18Lokmat (@News18lokmat) February 11, 2024
advertisement
हसता हसता पटकन डोळ्यांत पाणी आणणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय. सरोगसीवर भाष्य करणाऱ्या या कथेचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले असून दिग्दर्शक मोहसीन खान यांनी केले आहे. प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांनी उत्तम अभिनय केला असून 'डिलिव्हरी बॉय' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतोय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 11, 2024 4:06 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
VIDEO : 'डिलिव्हरी बॉय' पाहताना महिलेला अश्रू अनावर; अभिनेत्रीनं मिठी मारत केलं असं काही