'ये है मोहब्बतें' अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, 37 व्या वर्षी बनली आई!

Last Updated:

'ये है मोहब्बतें' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली शिरीन आणि तिचा पती हसन सरताज यांच्या घरी गोंडस बाळाचा जन्म झाला.

'ये है मोहब्बतें' अभिनेत्रीने दिली गुडन्यूज
'ये है मोहब्बतें' अभिनेत्रीने दिली गुडन्यूज
मुंबई : टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री शिरीन मिर्झा आता आई झाली आहे. 'ये है मोहब्बतें' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली शिरीन आणि तिचा पती हसन सरताज यांच्या घरी 9 जून 2025 रोजी गोंडस बाळाचा जन्म झाला. या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
शिरीनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं, " बेबी बॉय, अलहमदुलिल्लाह या सुंदर भेटवस्तूबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. आमच्या हृदयांना एक नवीन प्रेम मिळालं आहे. या नवीन प्रवासात आमच्या मुलासाठी प्रार्थना करा."
व्हिडिओमध्ये या नव्या प्रवासाबद्दलचे त्यांच्या दोघांचे भावनिक क्षण दिसून येतात. त्यांच्या या आनंदात चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला. रश्मी देसाई, कृष्णा मुखर्जी, अशिता धवन यांसारख्या अनेक छोट्या पडद्यावरील कलाकारांनी शिरीनला आई झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. कृष्णा मुखर्जीने लिहिलं, "नवीन पालकांना खूप खूप शुभेच्छा!"
advertisement
शिरीनने 2025च्या एप्रिलमध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. तिने आणि हसनने एक सुंदर व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप दाखवताना दिसली होती. त्या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं, "अल्लाहने आमच्या प्रार्थना ऐकल्या. एक छोटासा आत्मा, जो अर्धा त्याचा, अर्धा माझा आहे..."












View this post on Instagram























A post shared by Mirzashireen (@shireenmirza)



advertisement
शिरीनने 2021 मध्ये हसन सरताजसोबत जयपूरमध्ये थाटात लग्न केलं होतं. दिव्यांका त्रिपाठी, अली गोनी, कृष्णा मुखर्जी यांसारख्या स्टार्सनी त्या लग्नाला हजेरी लावली होती.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'ये है मोहब्बतें' अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, 37 व्या वर्षी बनली आई!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement