तुमच्या आयुष्यातील सर्वात लहान दिवस येतोय, नवे भीतीदायक कोडे; शास्त्रज्ञ चक्रावले, गोष्ट विज्ञानाच्या हाताबाहेर

Last Updated:

Science News in Marathi: पृथ्वी लवकरच स्वतःभोवतीच्या सर्वात वेगवान फिरण्याची नोंद करू शकते. ज्यामुळे दिवस इतिहासातील सर्वात लहान ठरेल. ही अनोखी घडामोड 9 जुलै, 22 जुलै किंवा 5 ऑगस्ट रोजी घडण्याची शक्यता असून यामागचं कारण अद्यापही वैज्ञानिकांनाही समजलेलं नाही.

News18
News18
मुंबई: 9 जुलै, 22 जुलै किंवा 5 ऑगस्ट रोजी पृथ्वीवर आजवरची सर्वात वेगवान स्वत:भोवती फिरण्याची नोंद होण्याची शक्यता आहे. ही माहिती खगोलशास्त्रज्ञ ग्रॅहम जोन्स यांनी Time and Date या वेबसाइटसाठी लिहिलेल्या लेखात दिली आहे.
या वेबसाइटनुसार, जेव्हा चंद्राची कक्षा भूमध्यरेषेच्या तुलनेत फारच उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे जाते. तेव्हा पृथ्वी थोडी अधिक वेगाने फिरते. या फिरण्यातील फरक अतिशय लहान असतो आणि त्याचे मोजमाप वैज्ञानिक एक अत्यंत अचूक अणुघड्यांद्वारे करतात. या मोजमापात दिवसाचा कालावधी (LOD – Length of Day) मिलिसेकंदामध्ये 24 तासांपेक्षा कमी किंवा जास्त किती आहे हे नोंदवले जाते.
advertisement
चीनच्या प्रयोगाने Science हादरलं, स्त्रीशिवाय संतती निर्माण; दोन पुरुषांच्या...
2020 पासून दरवर्षी दिवसाच्या कालावधीची सर्वात कमी नोंद केली गेली आहे. 1973 मध्ये जेव्हापासून नोंद ठेवण्यास सुरुवात झाली. 2024 मध्ये 5 जुलै रोजी दिवसाचा कालावधी -1.66 मिलिसेकंद इतका कमी होता. जो आतापर्यंतचा विक्रम आहे. यावर्षी 9 जुलै, 22 जुलै किंवा 5 ऑगस्ट रोजी हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. कारण त्यावेळी चंद्र भूमध्यरेषेपासून सर्वात दूर असणार आहे.
advertisement
मॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मॅथेमॅटिक्स येथील पृथ्वीच्या फिरण्याच्या अभ्यासातील तज्ज्ञ लिओनिड झोटोव्ह यांच्या मते, पृथ्वी एका दिवसासाठी इतक्या वेगाने का फिरते हे अजूनही स्पष्ट नाही.
बहुतांश वैज्ञानिकांचे मत आहे की याचे कारण पृथ्वीच्या आतमध्ये काहीतरी असावे. समुद्र आणि वातावरणासंबंधीचे मॉडेल्स या प्रचंड गतीवाढीचे स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत, असे त्यांनी वेबसाइटला सांगितले.
advertisement
याउलट चंद्राने प्रत्यक्षात पृथ्वीच्या फिरण्याचा वेग अब्जावधी वर्षांपासून कमी केला आहे. सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचा दिवस फक्त 3 ते 6 तासांचा असायचा. चंद्रामुळे निर्माण होणाऱ्या भरती-ओहोटीच्या शक्ती आणि चंद्र पृथ्वीच्या फिरण्यातील काही ऊर्जा शोषून घेतो यामुळे पृथ्वीचा वेग वर्षानुवर्षे कमी झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
तुमच्या आयुष्यातील सर्वात लहान दिवस येतोय, नवे भीतीदायक कोडे; शास्त्रज्ञ चक्रावले, गोष्ट विज्ञानाच्या हाताबाहेर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement