विश्वास नाही बसणार पण लालूंसाठी अडवाणी ठरले होते 'लकी चार्म', आजही MY फॅक्टर तेजस्वीला देतो रिटर्न!

Last Updated:

कट्टर विरोधक लालकृष्ण अडवाणी हेच लालू प्रसाद यादवांचे लकी चार्म ठरलेत, म्हणून आजही लालू प्रसाद यादव यांची बिहारमध्ये ताकद दिसून येते.

लालू प्रसाद यादव यांनी MY फॅक्टर कसा आपल्या बाजुने वळवला?
लालू प्रसाद यादव यांनी MY फॅक्टर कसा आपल्या बाजुने वळवला?
बिहारमध्ये सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी मतचोरीचा मुद्दा मोठा करत सर्वत्र प्रचाराला सुरुवात केलीय. एसआयआरवरूनही विरोधक मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपला टार्गेट करताना दिसत आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक भाजप आणि नितीश कुमारांसाठी फारशी सोपी असणार नाही. राज्यातील बेरोजगारी, स्थलांतर आणि अँटी इन्कम्बन्सीसारखे अनेक मुद्दे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जाणारी आहेत. अशात बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने अलीकडेच जातीय जनगणना केलीय. त्यामुळे यंदाही जातीय समीकरणांच्या आधारावर निवडणूक जिंकण्याचा एनडीएचा भर असल्याचं दिसून येतं.
मात्र ही निवडणूक भाजप आणि जनता दल युनायटेडसाठी वाटते तितकी सोपी नक्कीच असणार नाही. कारण बिहारमधील 'माय' (MY) अर्थात 'मुस्लीम-यादव' फॅक्टर भाजपच्या अगेन्स्ट जाण्याची शक्यता आहे. मागच्या अनेक निवडणुकांमध्ये लालूप्रसाद यांच्या कथित 'जंगल राज'बाबत प्रचार करून भाजप आणि नितीशकुमार सातत्याने सत्तेत येत आहेत. तथापि, लालूप्रसाद यांचा 'माय' फॅक्टर अजूनही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. विशेष म्हणजे ही व्होटबँक आपल्या बाजुने वळवण्यासाठी लालकृष्ण अडवाणी हे लालू प्रसादांसाठी 'लकी चार्म' ठरले होते. ते अडवाणी लालूंसाठी लकी चार्म कसे ठरले? याचीच स्टोरी सांगणारा हा लेख....
advertisement

लालकृष्ण अडवाणी लालूंसाठी 'लकी चार्म'

खरं तर, राम मंदिर आंदोलनादरम्यान लालू प्रसाद यादव यांनी लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली होती. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे जवळपास ३५ वर्षांपासून 'माय' फॅक्टर लालू प्रसाद यादव यांच्या बाजुने वर्कआऊट होत आहे. या अटकेमुळे बिहारमधील मुस्लीम मतदारांना एक मजबूत संदेश गेला होता की लालूप्रसाद हे त्यांना सुरक्षा देऊ शकतात. या मोठ्या मतदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी लालू प्रसाद यादव यांनी केंद्रातील व्हीपी सिंग सरकारला धोक्यात घालत अडवाणींना अटक करण्याचं धाडस दाखवलं होतं. त्यामुळे बिहारच्या राजकारणात आजही 'माय' फॅक्टर लालूंच्या बाजुने आहे. हा मतदार आपल्या बाजुने वळवण्यात आतापर्यंत ना भाजपला शक्य झालं, ना नितीश कुमारांना.
advertisement

तिसऱ्या प्रयत्नात अडवाणींना अटक

असं म्हटलं जातं की, लालूप्रसाद यादव यांनी अडवाणींना रथयात्रा न काढण्याचा आग्रह केला होता. परंतु अडवाणींनी नकार दिला. दोघांनीही एकमेकांना अटक करण्याचं चॅलेंज दिलं. त्यामुळे ही रथयात्रा लालू प्रसाद आणि अडवाणींसाठी प्रतिष्ठेची बनली होती. एकीकडे, अडवाणी यांनी रथयात्रेला सुरुवात केली, तर दुसरीकडे लालूप्रसाद यांनी अडवाणींना अटक करण्यासाठी डाव टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला अडवाणींना सासाराममध्ये अटक करण्याचा प्लॅन लालूंचा होता. परंतु तेथील पोलीस प्रशासन अडवाणींना अटक करण्यात फारसं इंटरेस्टेड नव्हतं. शिवाय असं काही केलं. तर अटकेचा प्लॅन लीक होण्याची भीती होती. त्यामुळे लालू प्रसादांचा पहिला डाव निष्फळ ठरला.
advertisement
त्यानंतर, लालूंनी धनबादमध्ये अडवाणींना अटक करण्याची योजना आखली. पण तेथील तत्कालीन डीसी अफजल अमानुल्लाह होते. ते मुस्लीम होते. शिवाय बाबरी कृती समितीशी संबंधित असलेल्या एका मुस्लीम पक्षकाराचे ते जावई होते. त्यामुळे, अडवाणींची तिथे अटक झाली तर या अटकेला धार्मिक रंग मिळाला असता, त्यामुळे ही अटकही रोखण्यात आली. शेवटी, समस्तीपूरमध्ये अडवाणींना गुप्तपणे अटक करण्यात आली.
advertisement

लालूंना 'माय' फॅक्टर तयार करण्यात यश

मधेपुराचे ज्येष्ठ पत्रकार तुर्वशु सचिंद्र या घटनेबद्दल सांगतात, बिहारमध्ये १९७० आणि १९८० च्या दशकात जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. या घटनांमुळे बिहारमधील मुस्लिमांचा राज्य आणि केंद्र स्तरावरील काँग्रेस सरकारांवर प्रचंड राग निर्माण झाला. त्यामुळे १९८९ च्या लोकसभा निवडणुका आणि १९९० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत संतप्त मुस्लिमांनी जनता दलाला भरभरून मतदान केलं. बिहारमध्ये मुस्लीमांना सुरक्षा मिळेल, अशी त्यांना आशा होती. अशात लालूंना आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी मुस्लीम-यादव व्होटबँक जपणं आवश्यक होतं.
advertisement
म्हणूनच त्यांनी अडवाणींना अटक केली आणि केंद्रातील सरकार पणाला लावलं. समस्तीपूरमध्ये अडवाणींना अटक करण्यामागे असंही सांगितलं जातं की, बीपी मंडल यांच्यामुळे कोसी आणि कर्पूरी ठाकूर यांच्यामुळे समस्तीपूर हा समाजवादी भाग मानला जात होता. त्यामुळे मुस्लीम बहुल समस्तीपूरमध्ये अडवाणींना अटक करून लालूंनी अप्रत्यक्षपणे मुस्लिमांना संदेश दिला होता.

लालूंनी 'माय' फॅक्टर वळवला पण सरकार पडलं

advertisement
पण या अटकेनंतर भाजपने केंद्रातील व्ही पी सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. तसेच जनता दलात देखील उभी फूट निर्माण झाली. जनता दलाचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर हे जनता दलातून 64 खासदारांना घेऊन बाहेर पडले. अन् बघता बघता केंद्रीतील व्हीपी सिंह याचं सरकार कोसळलं.

हेही वाचा-राजीव गांधींच्या घराबाहेर दोन पोलिसांनी चहा प्यायला अन् थेट सरकारच पडलं, प्रकरण गंभीर होतं...

मार्च 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानाबाहेर दोन हरियाणा पोलीस चहा पिताना आढळले होते. यानंतर थेट केंद्रातील सरकार पडलं होतं. हे प्रकरण साधं सरळ वाटत असलं तरी कांड मोठा होता. नक्की काय घडलं होतं? वाचा सविस्तर  
मराठी बातम्या/Explainer/
विश्वास नाही बसणार पण लालूंसाठी अडवाणी ठरले होते 'लकी चार्म', आजही MY फॅक्टर तेजस्वीला देतो रिटर्न!
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement