...जर तिसरं महायुद्ध झालं तर किती होईल नुकसान? कोणत्या देशाला बसेल फटका?
- Published by:sachin Salve
Last Updated:
रशिया, युक्रेन, इस्रायल, इराण, लेबॅनॉन आणि सीरिया हे देश सध्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात युद्धामध्ये गुंतलेले आहेत.
रशिया, युक्रेन, इस्रायल, इराण, लेबॅनॉन आणि सीरिया हे देश सध्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात युद्धामध्ये गुंतलेले आहेत. त्यात हमास आणि हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनांचीही भर पडलेली आहे. याशिवाय, जगातले 40हून अधिक इस्लामिक देश इस्रायलच्या विरोधात एकत्र येण्याच्या तयारीत असून रशिया त्यांना बाहेरून पाठिंबा देत आहे. दुसरीकडे, अमेरिकेसह नाटो गटातले देश इस्रायलच्या पाठीशी उभे राहिले आहेत. उत्तर कोरिया हा देश सतत अणुचाचण्या करून युद्धाची धमकी देत आहे. या सगळ्या गोंधळात आशियातील दोन प्रबळ शक्ती असलेले भारत आणि चीन एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या तैवानवर हल्ला करण्यासाठी चीन आसुलेला आहे.
सध्याच्या भू-राजकीय स्थितीचं वर्णन वाचून तुमच्याही मनात तिसऱ्या जागतिक महायुद्धाचे विचार आले नसतील तर नवलच! आपण पुन्हा एकदा महायुद्धाकडे वाटचाल करत आहोत का, हा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. ज्योतिषशास्त्र क्षेत्रातले दिग्गज आणि भारताचे 'नॉस्ट्रॅडॅमस' अशी ओळख असणारे कुशल कुमार यांनी गेल्या वर्षीच याबाबत भाकीत केलं होतं. ते म्हणाले होते, की 2024 हे जगासाठी या शतकातलं सर्वांत तणावपूर्ण वर्ष ठरणार आहे.
advertisement
सध्याची भू-राजकीय परिस्थितीही याच दिशेने बोट दाखवत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर परिस्थिती आणखी बिघडली आणि तिसरं महायुद्ध झालं तर जगाचं किती आर्थिक नुकसान होईल आणि त्याचा कोणत्या देशाला सर्वाधिक फटका सोसावा लागेल, याबाबत सोशल मीडियावर एक ट्विट ट्रेंड करत आहे.
तिसऱ्या महायुद्धाची भीती इतकी वाढली आहे, की आज एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते ट्रेंडिंगला आहे. त्याला लाखो व्ह्यूज मिळत असून अनेक कमेंट्सही येत आहेत. इतकंच नाही तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि विद्यमान उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनीही याबाबत शक्यता वर्तवली आहे. त्यांचं म्हणणं आहे, की जग पुन्हा एकदा गंभीर समस्येला तोंड देत आहे.
advertisement
किती होईल आर्थिक नुकसान?
तिसऱ्या महायुद्धाबाबत अंदाज बांधले जात आहेत. हे महायुद्ध झालं तर किती आर्थिक नुकसान होईल याबाबत अचूक अंदाज लावणं शक्य नाही; पण दुसऱ्या महायुद्धात झालेल्या नुकसानीच्या आधारे विश्लेषक भविष्यातल्या नुकसानाचा अंदाज लावत आहेत.
1939 ते 1945 या काळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या अभ्यासक आणि इतिहासकार डॉ. हेलन फ्राय यांच्या म्हणण्यानुसार, त्या काळातल्या आर्थिक नुकसानाचा सध्याच्या मूल्यानुसार हिशेब केला तर सुमारे 21 ट्रिलियन डॉलर्सचं (सुमारे 1,764 लाख कोटी रुपये) नुकसान झालं होतं. तिसऱ्या महायुद्धात यापेक्षा 1000 पट अधिक नुकसान होऊ शकतं, असा अंदाज आहे. ही संख्या 17,64,000 लाख कोटी रुपये असू शकते.
advertisement
जास्त नुकसान का होईल?
तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की सध्या जगाकडे मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रं आहेत. आता युद्ध झालं, तर ते जमीन, पाणी, आकाशासह सायबर माध्यमातूनदेखील लढलं जाईल. त्यामुळे जीवितहानीबरोबरच मोठी वित्तहानी होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अणुशक्ती फक्त अमेरिकेकडे होती. आता जगातल्या डझनभर देशांकडे अणुबॉम्ब आहेत. अनेक देशांनी हायड्रोजन बॉम्ब आणि रासायनिक शस्त्रंही विकसित केली आहेत. त्यामुळे पुन्हा महायुद्ध झाल्यास किती नुकसान होऊ शकतं, याची आपण कल्पना न केलेलीच बरी.
advertisement
जास्त फटका कोणाला बसणार?
दुसऱ्या महायुद्धात युरोपीय देशांना सर्वाधिक फटका बसला होता. आता तिसरं महायुद्ध झालं तर त्याचा सर्वाधिक परिणाम अमेरिका आणि रशियावर होईल. कारण, या दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात इतर अनेक देशांना एकत्र केलं आहे. युद्ध झाल्यास या दोन्ही देशांना आपल्या मित्र राष्ट्रांना आर्थिक मदतीसह शस्त्रंदेखील पुरवावी लागतील. युक्रेन-रशिया युद्धात अमेरिकेने युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची थेट मदत केली आणि सोबत अनेक शस्त्रंही पाठवली आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2024 11:08 PM IST