advertisement

आता पार्किंगचे नो टेंशन, ॲपवरून बुक करता येणार जागा, छ. संभाजीनगर महापालिकेचा निर्णय

Last Updated:

ही समस्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने याकरिता एक ॲप तयार केलेला आहे. सीएसएन स्मार्ट पार्क नावाचे ॲप तयार केले आहे.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर हे झपाट्याने वाढत चाललेले आहे. यामुळे शहरामध्ये वाहतुकीची समस्या वाढत आहे. त्यासोबतच शहरामध्ये वाहन पार्किंग करण्यासाठी देखील मोठी समस्या येत आहे. ही समस्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने याकरिता एक ॲप तयार केलेला आहे. सीएसएन स्मार्ट पार्क नावाचे ॲप तयार केले आहे. या ॲपद्वारे नागरिकांना पार्किंगची जागा ॲडव्हान्समध्ये बुक करता येणार आहे.
‎जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर या योजनेची सुरुवात होणार आहे. यासाठी गुजरातमधील एसएमपी मोबिटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. नागरिकांची वाहने महापालिकेचे माजी सैनिक आणि  कंत्राटदाराचे कर्मचारी उचलून नेतात. ती सोडवण्यासाठी गरवारे स्टेडियम किंवा बाबा पेट्रोल पंप चौकात जावे लागते. दुचाकीसाठी 500 रुपये, चारचाकीसाठी 2 हजार रुपये दंड भरावा लागतो. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे.
advertisement
यामुळेच महानगरपालिकेने हे ॲप तयार केले आहे. या ॲपमुळे आता नागरिकांना पार्किंगसाठी जागा शोधणे सोपे जाणार आहे. त्यासोबतच गाडी उचलण्याची भीती देखील नागरिकांमध्ये राहणार नाही आहे. ॲपद्वारे मार्केट परिसरात पार्किंगची जागा बुक करता येईल. दुचाकीसाठी 10 रुपये, तीनचाकीसाठी 15 रुपये आणि चारचाकीसाठी 20 रुपये प्रति तास दर आकारले जातील.
हे जे ॲप आम्ही सुरू केलेले आहे, या ॲपमुळे सर्वसामान्य जनतेला खूप फायदा होणार आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो की आपण देखील या ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा. जेणेकरून आपल्या शहरामध्ये वाहतुकीची समस्या ही सोडवण्यासाठी आम्हाला मदत होईल आणि नक्कीच हे ॲप सर्वांसाठी फायदेशीर ठरेल, असे महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत म्हणाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
आता पार्किंगचे नो टेंशन, ॲपवरून बुक करता येणार जागा, छ. संभाजीनगर महापालिकेचा निर्णय
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement