Sudarshan Chakra Explainer: जग थरारेल असा डिफेन्स नेटवर्क! ‘सुदर्शन चक्र’ने आकाश-समुद्र दोन्ही होणार लॉक, शत्रू राष्ट्रांना हादरवणारी पंतप्रधानांची घोषणा

Last Updated:

Project Sudarshan Chakra: भारताने ‘सुदर्शन चक्र’ नावाचा बहुस्तरीय स्वदेशी हवाई संरक्षण प्रकल्प जाहीर केला आहे. जो 2035 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. ही प्रणाली क्षेपणास्त्रे, ड्रोन, स्वॉर्म आणि अन्य हवाई धोके काही सेकंदांत निष्प्रभ करू शकणार आहे.

News18
News18
जूनमधील एका उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीत भारताच्या नेतृत्वाने देशाची स्वतःची स्वदेशी, बहुस्तरीय हवाई संरक्षण ढाल (multi-layer aerial defence shield) तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) दरम्यान अनेक हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी अधिक मजबूत प्रणालीची गरज भासल्याने या कल्पनेला तातडीचे स्वरूप प्राप्त झाले, अशी माहिती या घडामोडींची जाण असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचे नाव 'सुदर्शन चक्र' असे जाहीर केले. हे एक दशकाहून अधिक काळ चालणारे एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. ज्याचा उद्देश एक व्यापक, स्वदेशी आणि एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली (integrated aerial defence system) निर्माण करणे आहे.
प्रकल्पाचे स्वरूप आणि उद्दिष्ट
न्यूज18 शी बोलताना नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा प्रकल्प अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्याची एकूण रचना आणि विशिष्ट तंत्रज्ञान अद्याप अंतिम झालेले नाही. ही प्रणाली भारताच्या सध्याच्या लहान हवाई संरक्षण संरचनेशी (existing minor aerial defence framework) जोडली जाईल. या संरचनेद्वारे शहरे, लष्करी तळ आणि ऊर्जा प्रकल्प, रेल्वे, बंदरे तसेच रुग्णालये यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे हवाई धोक्यांपासून संरक्षण केले जाईल.
advertisement
यापूर्वी अशाच संरक्षण तंत्रज्ञानावर काम केलेल्या आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रस्तावित तंत्रज्ञानाचे वर्णन करताना सांगितले की- हे रडार, कमांड-अँड-कंट्रोल सेंटर्स आणि इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचे एक देशव्यापी नेटवर्क असेल. जे येणाऱ्या क्षेपणास्त्रे, ड्रोन, तोफांचे गोळे आणि ‘लोयटरिंग म्युनिशन’ (loitering munitions) तसेच ‘स्वॉर्म्स’ (swarms) शोधून, त्यांचा मागोवा घेऊन आणि त्यांना रिअल टाइममध्ये निष्क्रिय करू शकेल. या प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची (Artificial Intelligence) महत्त्वाची भूमिका असण्याची शक्यता आहे.
advertisement
सुदर्शन चक्र ही बहुस्तरीय रणनीतीचा एक भाग असेल, जी सध्याच्या आकाश (Akash), S-400 आणि QR-SAM सारख्या प्रणालींसोबत काम करेल. तसेच भविष्यातील लेझर-आधारित इंटरसेप्टरसोबतही ती जोडली जाईल. ज्यामुळे कमी, मध्यम आणि लांब पल्ल्याच्या धोक्यांपासून आच्छादित संरक्षण मिळेल. यामुळे ही प्रणाली एक प्रभावी 'अम्ब्रेला डिफेन्स नेटवर्क' (umbrella defence network) म्हणून काम करेल.
advertisement
'आत्मनिर्भर भारत' आणि 'सुदर्शन चक्र'
'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत विकसित होणाऱ्या या कार्यक्रमात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि अनेक खासगी कंपन्या सहभागी असतील, ज्या यापूर्वीच संबंधित प्रकल्पांवर काम करत आहेत. इस्रायलच्या 'आयर्न डोम' (Iron Dome) प्रणालीच्या तुलनेत जी केवळ कमी पल्ल्याच्या रॉकेट आणि मोर्टार हल्ल्यांवर लक्ष केंद्रित करते. भारताची ही प्रणाली लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांसह अनेक धोक्यांना तोंड देण्यासाठी तयार केली जात आहे. यामुळे पाकिस्तान आणि चीनकडून संभाव्य हल्ल्यांना विविध भूभागांमध्ये तोंड देण्याची भारताची गरज दिसून येते.
advertisement
2035 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित
लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही भगवान कृष्णाच्या सुदर्शन चक्राचा मार्ग निवडला आहे. देशाची आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमच्या क्षमता सातत्याने वाढवत राहू. मी तुम्हाला आश्वासन देतो की पुढील 10 वर्षांत, मग ते सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असो, नागरी परिसर असो, किंवा आपली श्रद्धास्थाने असोत, आम्ही कोणत्याही हल्ल्याचा सामना करण्यास सक्षम असे 'राष्ट्रीय सुरक्षा कवच' तयार करू.
advertisement
अलीकडील घटनांचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले, आम्ही जगाला आमची क्षमता दाखवून दिली आहे आणि सिद्ध केले आहे की भारत कोणत्याही प्रकारच्या युद्धाला तोंड देण्यासाठी तयार आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही हे दाखवून दिले. पाकिस्तानने आमच्या लष्करी तळांवर, नागरी भागांवर आणि आमच्या मंदिरांवर हल्ले केले, पण आमच्या हवाई संरक्षण प्रणालीने - आमच्या सुदर्शन चक्राने - त्यांचे सर्व हल्ले निष्प्रभ केले.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
Sudarshan Chakra Explainer: जग थरारेल असा डिफेन्स नेटवर्क! ‘सुदर्शन चक्र’ने आकाश-समुद्र दोन्ही होणार लॉक, शत्रू राष्ट्रांना हादरवणारी पंतप्रधानांची घोषणा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement