Science of Cricket: क्रिकेटमधील अनोखा नियम, चेंडू कबूतरांना लागला तर काय होते? ओवल टेस्टमध्ये मॅच सोडून भलतीच चर्चा

Last Updated:

IND vs ENG: भारत-इंग्लंड कसोटीदरम्यान 'द ओव्हल' मैदानावर कबूतरांचा थवा वारंवार मैदानात आला. एक चेंडू कबूतराला लागता लागता वाचला आणि त्यामुळे 'डेड बॉल' नियम चर्चेत आला.

News18
News18
ओव्हल: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारी लंडनमधील ‘द ओव्हल’ मैदानावर सुरू झाला. या सामन्याच्या दरम्यान मैदानावर कबूतरांचा थवा अनेक वेळा दिसून आला. एक वेळ तर अशीही आली की, कबूतर थेट चेंडूच्या रेषेत आला होता आणि मात्र थोडक्यात वाचला.
अशा प्रसंगी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, जर चेंडू थेट त्या पक्ष्याला किंवा प्राण्याला लागला असता, तर काय झाले असते? आणि अशा प्रसंगी क्रिकेटचे नियम काय सांगतात?
पावसाचा अडथळा, कबूतरांचं आगमन
या सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाने बराच व्यत्यय आणला. एकूण केवळ 64 षटकांचा खेळ होऊ शकला आणि भारताने 204/6 असा स्कोअर केला. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी आणि हिरव्या खेळपट्टीने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले.
advertisement
दरम्यान मैदानात सतत कबूतरांचे थवे दिसत होते. पहिल्या दिवशी भारतीय फलंदाज साई सुदर्शन स्ट्राइकवर होते आणि इंग्लंडचा गोलंदाज चेंडू टाकत होता तेव्हा एक चेंडू कबूतराला लागणार होतो. त्याआधी केएल राहुल जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
जर चेंडू पक्ष्याला लागला असता तर काय?  
क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू एखाद्या पक्ष्याला, प्राण्याला किंवा इतर कोणत्याही अडथळ्याला लागल्यास काय होते? अशा परिस्थितीत अंपायर "डेड बॉल" घोषित करतो.
advertisement
म्हणजेच जर ओव्हल मैदानात चेंडू कबूतराला लागला असता, तर त्या चेंडूला डेड बॉल घोषित करण्यात आले असते. उदाहरणार्थ साई सुदर्शन फलंदाजी करत असताना जर कबूतर समोर आला असता आणि त्याचवेळी ते बोल्ड झाले असते तरीदेखील चेंडू डेड बॉल मानला गेला असता.
क्रिकेटचे नियम तयार करणारी संस्था MCC (मेरिलबोर्न क्रिकेट क्लब) ने आपल्या वेबसाइटवर ‘डेड बॉल’ संदर्भात स्पष्ट नियम दिले आहेत.
advertisement
MCC चे 'डेड बॉल' नियम काय सांगतात?
MCC च्या नियमानुसार, डेड बॉल कधी घोषित करायचा हे पूर्णपणे अंपायरच्या विवेकावर अवलंबून असते.
MCC च्या आर्टिकल 20.4.2.12 नुसार:
advertisement
जर अंपायरला असे वाटले की एखादा प्राणी, पक्षी, व्यक्ती किंवा कोणतीही वस्तू मैदानावर आली आहे आणि त्यामुळे एखाद्या संघाला नुकसान झाले आहे तर अंपायर डेड बॉल घोषित करू शकतो.
तसेच जर दोन्ही अंपायरांना वाटले की चेंडू आपोआप सीमारेषेवर गेला असता तर ते बाउंड्री देखील देऊ शकतात.
advertisement
'अनवॉन्टेड' पाहुणे
क्रिकेटच्या मैदानात पक्ष्यांचे किंवा प्राण्यांचे येणे काही नवीन नाही. इंग्लंडमधील काउंटी सामन्यांत मोर देखील मैदानावर आले आहेत. कबूतर तर नेहमीच दिसतात. ऑस्ट्रेलियात सीगल पक्षी खेळादरम्यान दिसतात. साउथ आफ्रिकेमध्ये Hadeda Ibis नावाचा पक्षी खेळादरम्यान अनेकदा मैदानात येतो. भारतात अनेक वेळा कावळे खेळादरम्यान दिसले आहेत.
2022 मध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली होती – गुवाहाटीमध्ये भारत आणि साउथ आफ्रिका यांच्यातील टी20 सामन्यात चक्क साप मैदानात आला होता.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
Science of Cricket: क्रिकेटमधील अनोखा नियम, चेंडू कबूतरांना लागला तर काय होते? ओवल टेस्टमध्ये मॅच सोडून भलतीच चर्चा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement