नेमके कोणत्या कॅटेगरीतून होतात सर्वाधिक IAS, IPS; उत्तर आलं समोर
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
यूपीएससी परीक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा अर्थात आयएएस, भारतीय पोलीस सेवा अर्थात आयपीएस आणि भारतीय वन सेवा अर्थात आयएफएसमध्ये एससी, एसटी, ओबीसी अशा विविध आरक्षण प्रवर्गातून नेमके किती अधिकारी निवडले जातात, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. त्यावर आता संसदेमध्ये उत्तर देण्यात आलंय.
नवी दिल्ली: प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात चर्चेत आल्या आहेत. आरक्षण आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. त्यातच आता यूपीएससीनं पूजा खेडकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल केलाय; मात्र या निमित्ताने यूपीएससी परीक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा अर्थात आयएएस, भारतीय पोलीस सेवा अर्थात आयपीएस आणि भारतीय वन सेवा अर्थात आयएफएसमध्ये एससी, एसटी, ओबीसी अशा विविध आरक्षण प्रवर्गातून नेमके किती अधिकारी निवडले जातात, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. त्यावर आता संसदेमध्ये उत्तर देण्यात आलंय.
अशी आहे निवड प्रक्रिया: यूपीएससीद्वारे 2018 ते 2022 या वर्षात अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातून निवडलेल्या आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. संसदेत यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारनं ही माहिती दिलीय. आतापर्यंत एससी, एसटी आणि ओबीसीमधून किती आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी निवडण्यात आले आहेत, असा प्रश्न सरकारला विचारण्यात आला होता. त्यावर मोदी सरकारमधले मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सविस्तर उत्तर दिलंय.
advertisement
आरक्षणनिहाय भरती झालेल्या अधिकाऱ्यांची संख्या:
संसदेत मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितलं, की ‘2018 मध्ये ओबीसी प्रवर्गातून 54 आयएएस, 40 आयपीएस आणि 40 आयएफएस निवडण्यात आले. या वर्षी एससी प्रवर्गातून 29 आयएएस, 23 आयपीएस आणि 16 आयएफएस व एसटी प्रवर्गातून 2018मध्ये 14 आयएएस, 9 आयपीएस आणि 8 आयएफएस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.’
advertisement
‘2019मध्ये ओबीसी प्रवर्गातून 61 आयएएस, 42 आयपीएस आणि 33 आयएफएस निवडण्यात आले. या वर्षी एससी प्रवर्गातून 28 आयएएस, 24 आयपीएस आणि 13 आयएफएस व एसटी प्रवर्गातून 14 आयएएस, 9 आयपीएस आणि 7 आयएफएस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. 2020मध्ये ओबीसी प्रवर्गातून 61 आयएएस, 41 आयपीएस आणि 31 आयएफएस निवडण्यात आले. या वर्षी एससी प्रवर्गातून 25 आयएएस, 23 आयपीएस आणि 13 आयएफएस व एसटी प्रवर्गातून 13 आयएएस, 10 आयपीएस आणि 6 आयएफएस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे,’ अशी माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी संसदेत दिली.
advertisement
‘2011मध्ये ओबीसी प्रवर्गातून 54 आयएएस, 57 आयपीएस आणि 34 आयएफएस निवडण्यात आले. या वर्षी एससी प्रवर्गातून 30 आयएएस, 28 आयपीएस आणि 13 आयएफएस व एसटी प्रवर्गातून 13 आयएएस, 14 आयपीएस आणि 7 आयएफएस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. 2022मध्ये ओबीसी प्रवर्गातून 58 आयएएस, 49 आयपीएस आणि 40 आयएफएस निवडण्यात आले. या वर्षी एससी प्रवर्गातून 28 आयएएस, 25 आयपीएस आणि 16 आयएफएस व एसटी प्रवर्गातून 14 आयएएस, 20 आयपीएस आणि 8 आयएफएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे,’ असं सांगतानाच डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे, की ‘आयएएस, आयपीएस आणि आयएफएसमध्ये भरती केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नियमानुसार केली जाते. सध्या या भरतीमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी यांना अनुक्रमे 15 टक्के, 7.5 टक्के आणि 27 टक्के आरक्षण देण्यात येतं.’
Location :
New Delhi,Delhi
First Published :
July 25, 2024 11:00 PM IST