Registered Post Service Explainer: ‘रजिस्टर्ड पोस्ट’ बंद होण्यावरून देशभरात गोंधळ, टपाल विभागाने फोडली अफवेची हवा; दिलं मोठं अपडेट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Registered Post Service: सोशल मीडियावर 1 सप्टेंबरपासून ‘रजिस्टर्ड पोस्ट’ सेवा बंद होणार असल्याच्या अफवा पसरताच ग्राहकांमध्ये गोंधळ उडाला. मात्र टपाल विभागाने स्पष्ट केले आहे की ही सेवा बंद होत नसून स्पीड पोस्टसोबत एकत्रित करून आणखी जलद करण्यात आली आहे.
भारतीय टपाल विभागाची 'रजिस्टर्ड पोस्ट' सेवा बंद होणार असल्याचा मेसेज सोशळ मीडियावर आला अन् अनेकांना धक्काच बसला. टपाल विभागाची 'रजिस्टर्ड पोस्ट' सेवा १ सप्टेंबरपासून बंद होणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाले त्यानंतर अनेक माध्यमांनी त्यावरुन ही सेवा बंद होणार असल्याचे वृत्त दिले. मात्र आता यावर टपाल विभागाने खर काय ते सांगितले आहे.
टपाल विभागाने स्पष्ट केले आहे की, त्यांची 'रजिस्टर्ड पोस्ट' सेवा बंद करण्यात आलेली नाही. या संदर्भात पसरलेल्या अफवांना टपाल विभागाने फेटाळले आहे. उलट कामकाजामध्ये सुलभता आणण्यासाठी ही सेवा 'स्पीड पोस्ट' सोबत एकत्र करण्यात आली आहे.
फॅक्ट चेक: रजिस्टर्ड पोस्ट बंद केली जात नाहीये. इंडिया पोस्टने ही सेवा स्पीड पोस्टसोबत विलीन करून अधिक अद्ययावत केली आहे, असे इंडिया पोस्टने बुधवारी X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
advertisement
मंत्रालयाने एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे की, टपाल सेवांमध्ये सुधारणा केली जात आहे. मेलच्या कामकाजाला सुव्यवस्थित करण्यासाठी, वितरण वेळेत सुधारणा करण्यासाठी आणि लॉजिस्टिक्स संसाधनांचा चांगला वापर करण्यासाठी टपाल विभागाने आपली सॉर्टिंग (वर्गीकरण) यंत्रणा तर्कसंगत केली आहे आणि रजिस्टर्ड आणि स्पीड पोस्ट दोन्ही वस्तूंवर प्रक्रिया एकसमान केली आहे. या विलीनीकरणामुळे मागील कामकाजाची कार्यक्षमता वाढेल, प्रवासातील विलंब कमी होईल आणि नेटवर्कमध्ये चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल, असे त्यात नमूद केले आहे.
advertisement
Fact Check: Registered Post is NOT being discontinued.
India Post has upgraded the service by merging it with Speed Post. Here’s what that means for you. 👇
— India Post (@IndiaPostOffice) August 7, 2025
दोन्ही सेवांना खूप महत्त्व आहे कारण त्या Accountable Services मानल्या जातात. याचा अर्थ, वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि वस्तूंचा मागोवा घेता यावा यासाठी प्रत्येक टप्प्यावर तपशीलवार नोंदी ठेवल्या जातात.
advertisement
'रजिस्टर्ड पोस्ट' ही प्राप्तकर्त्यासाठी विशिष्ट असते म्हणजे ती केवळ इच्छित व्यक्तीला किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीला दिली जाते. याउलट'स्पीड पोस्ट' ही पत्त्यासाठी विशिष्ट असते. याचा अर्थ ती दिलेल्या पत्त्यावर उपलब्ध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला दिली जाऊ शकते. आता अधिक कार्यक्षम वितरण यंत्रणेसाठी या दोन्ही सेवा एकत्र केल्या जात आहेत.
इंडिया पोस्टने स्पष्ट केले आहे की, कामकाजाच्या कार्यक्षमतेसाठी या सेवांचे विलीनीकरण केले असले तरी 'रजिस्टर्ड पोस्ट' ची प्रमुख वैशिष्ट्ये कायम ठेवली जातील. यामध्ये व्यक्ती-विशिष्ट वितरण, रिअल-टाईम ट्रॅकिंगसह वितरण पावती आणि पोचपावती यांचा समावेश आहे.
advertisement
आता 'रजिस्टर्ड पोस्ट' स्पीड पोस्टच्या वेगाने पाठवा: विश्वासार्हतेवर कोणताही परिणाम नाही, फक्त जलद परिणाम, असे इंडिया पोस्टने म्हटले आहे. याचा अर्थ ग्राहकांना आता 'स्पीड पोस्ट विथ रजिस्ट्रेशन' (Speed Post with registration) सेवेद्वारे आपले पार्सल पाठवण्याचा पर्याय मिळेल. यामुळे जलद वितरण सुनिश्चित होईल. त्याचबरोबर व्यक्ती-विशिष्ट वितरणाची सोयही कायम राहील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 08, 2025 6:28 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
Registered Post Service Explainer: ‘रजिस्टर्ड पोस्ट’ बंद होण्यावरून देशभरात गोंधळ, टपाल विभागाने फोडली अफवेची हवा; दिलं मोठं अपडेट


