Science of Cricket: आकाश दीपच्या Contact pointने घडवले नाट्य, ब्रिटिशांचा डाव फसला; नो-बॉल की परफेक्ट डिलिव्हरी समजून घ्या

Last Updated:

Joe Root Wicket Akash Deep No Ball Controversy: एजबॅस्टन कसोटीत आकाश दीपने जो रुटला क्लीन बोल्ड करत निर्णायक विकेट घेतली. मात्र या विकेटनंतर इंग्लंड मीडिया आणि चाहत्यांनी नो-बॉलचा वाद उकरून काढला. पण या दाव्यात खरच काही दम आहे जे समजून घ्या...

News18
News18
Science of Cricket: भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच दुसरी कसोटी झाली. एजबॅस्टन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी भारताने इंग्लंडवर 336 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. ही कसोटी फक्त भारतासाठी नाही तर जागतिक कसोटी क्रिकेटच्या इतिहासात महत्त्वाची ठरली आहे. या मॅचमध्ये असे काही विक्रम झाले आहेत ज्याची दखल घेणे वर्ल्ड क्रिकेटला देखील भाग पाडले.
भारताचा कर्णधार शुभमन गिलने द्विशतक आणि शतकी खेळी केली. तर भारताचा जलद गोलंदाज आकाश दीपने दोन्ही डावात मिळून १० विकेट घेण्याची कामगिरी केली. मात्र आकाश दीपच्या एका विकेटवरून मोठा वाद झाला. अर्थात हा वाद ब्रिटिश मीडियाकडून मोठा करण्यात आला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात आकाशने अनुभवी जो रुटला क्लिन बोल्ड केले. रुटची विकेट भारतासाठी फार महत्त्वाची होती तर इंग्लंडसाठी मॅच गमवल्यासारखी होती.
advertisement
रुटच्या विकेटवर समालोचक अॅलिसन मिशेलने असा दावा केली की, चेंडू टाकताना आकाश दीपचा मागचा पाय रिटर्न क्रीझच्या बाहेर होता. त्यामुळे हा नो बॉल होता आणि अंपायरने लक्ष दिले नाही. यावरून सोशल मीडियावर देखील बराच वाद झाला. पण क्रिकेटचा नियम काय आहे. हेच आपण Science of Cricketच्या या भागात समजून घेणार आहोत.
advertisement
रुट ज्या चेंडूवर बाद झाला ते चेंडू खरच नो बॉल होता किंवा आकाश दीपचा तो चेंडू Legal delivery होता का नाही ये समजून घेण्यासाठी क्रिकेटच्या नियमात डोकावण्याची गरज आहे. क्रिकेटमध्ये गोलंदाजाकडून चेंडू टाकताना दोन प्रकारे नो बॉल टाकला जाऊ शकतो. पहिला म्हणजे जो सर्वांना माहिती आहे, जेव्हा गोलंदाजाचा पुढचा पाय क्रीझच्या पुढे जातो. यातील दुसरा नो बॉल म्हणजे बॅकफूट नो बॉल होय. म्हणजे गोलंदाजाचा मागचा पाय रिटर्न क्रीझच्या लाइनवर किंवा त्याच्या बाहेर जातो.
advertisement
आता येऊयात आकाश दीपने टाकलेल्या चेंडूकडे ज्यावर रुट बाद झाला आणि इंग्लंड मीडिया आणि चाहते नो-बॉलवर बाद दिल्याचे बोलू लागले. आकाश दीपने टाकलेल्या चेंडूचा रिप्ले पाहिल्यास हे स्पष्टपणे दिसते की, त्याच्या मागच्या पायाचा Contact point हा रिटर्न क्रीझच्या लाइनच्या आत आहे आणि त्याची टाच लाइनवर पडली आहे. त्यामुळे नियमानुसार हा नो-बॉल ठरत नाही.
advertisement
advertisement
ज्या गोष्टीवरून इंग्लंडमधील माध्यमे आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. आणि दावा केला जात आहे की आकाश दीपने टाकलेला चेंडू नो बॉल होता. तर या दाव्याला क्रिकेटच्या नियमात काही स्थान नाही. भारताचा माजी जलद गोलंदाज इरफान पठण याने देखील ही गोष्ट स्पष्ट करून सांगितली आहे. मॅच सुरू असताना कमेंट्री बॉक्समध्ये असलेल्या रवी शास्त्री आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यात चर्चा झाली. ज्यामध्ये दोघांनीही एमसीसी नियम 21.5.1 ची आठवण करून दिली होती.
मराठी बातम्या/Explainer/
Science of Cricket: आकाश दीपच्या Contact pointने घडवले नाट्य, ब्रिटिशांचा डाव फसला; नो-बॉल की परफेक्ट डिलिव्हरी समजून घ्या
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement