Who Is Parag Jain: सिक्रेट मिशनचा बॉस झाला R&AW Chief, गुप्त युद्धाला मिळाला नवा सेनापती; खलिस्तान,पाकिस्तान,चीनचा थरकाप उडवणारा अधिकारी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
New R&AW Chief Parag Jain: मोदी सरकारने पराग जैन यांची R&AWच्या सचिवपदी नियुक्ती केली असून, ते 1 जुलैपासून पदभार स्वीकारणार आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’सह अनेक आंतरराष्ट्रीय गुप्त मोहिमांचा अनुभव असलेल्या जैन यांची ही निवड भारताच्या बाह्य सुरक्षा धोरणात मोठा टर्निंग पॉईंट मानली जात आहे.
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने शनिवारी पंजाब केडरचे 1989 बॅचचे आयपीएस अधिकारी पराग जैन यांची भारताच्या प्रमुख गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (R&AW) च्या सचिवपदी नियुक्ती केली. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांसाठी निश्चित करण्यात आला असून ते 1 जुलैपासून पदभार स्वीकारतील. जैन हे सध्याचे सचिव रवी सिन्हा यांची जागा घेणार असून सिन्हांचा कार्यकाळ 30 जूनला संपतो. त्यांच्या कार्यकाळाला तुलनात्मकदृष्ट्या 'लो-प्रोफाइल' समजलं जात होतं.
ही नियुक्ती 28 जून रोजी कॅबिनेटच्या अपॉईंटमेंट कमिटीने मंजूर केली असून त्यामुळे या अत्यंत संवेदनशील सुरक्षा संस्थेमध्ये नेतृत्वबदलाबाबतची चर्चाही थांबली आहे.
सध्या ARC प्रमुख – 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये महत्त्वाची भूमिका
सध्या पराग जैन हे R&AW अंतर्गत कार्यरत असलेल्या महत्त्वाच्या 'एव्हिएशन रिसर्च सेंटर' (ARC) चे प्रमुख आहेत. ARC हे R&AW चे तांत्रिक आणि गुप्तचर गोळा करणारे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या अचूक प्रत्युत्तर कारवाईत – ऑपरेशन सिंदूर मध्ये – ARC च्या नेतृत्त्वाखाली पराग जैन यांनी पाकिस्तानी लष्कराच्या हालचालींबाबत HUMINT (मानवी गुप्तचर) आणि TECHINT (तांत्रिक गुप्तचर) च्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती पुरवली होती.
advertisement
R&AW मधील 15 वर्षांचा अनुभव
सध्या R&AW मध्ये जैन हे दुसऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ अधिकारी असून थेट प्रमुखांना रिपोर्ट करतात. त्यांनी अनेक महत्त्वाचे ऑपरेशनल आणि गुप्तचर विभाग हाताळले आहेत. त्यांचा सखोल अनुभव या क्षेत्रांमध्ये आहे.
-दहशतवादविरोधी ऑपरेशन्स
-पंजाबमधील अंतर्गत सुरक्षा
-शीख दहशतवाद व खलिस्तानशी संबंधित हालचाली
-सीमापार व परदेशातील भारतीय वंशियांवर लक्ष
advertisement
त्यांची ही नियुक्ती अशा काळात झाली आहे जेव्हा भारत परदेशात – विशेषतः कॅनडा, यूके आणि ऑस्ट्रेलिया – कार्यरत खलिस्तान समर्थक गटांविरोधातील धोरण अधिक तीव्र करत आहे.
जागतिक पातळीवरील गुप्तचर अनुभव
पराग जैन यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनुभव असून कॅनडाच्या ओटावा येथे त्यांची एक अत्यंत संवेदनशील नेमणूक झाली होती. तेथे त्यांनी शीख विभाजनवादी चळवळींवर लक्ष ठेवून काही नेटवर्क्समध्ये घुसखोरी करण्याचं काम केलं. त्यानंतर त्यांना 2022 मधील आर्थिक संकटाच्या काळात श्रीलंकेत पाठवण्यात आलं होतं. जिथे त्यांनी सत्तांतर आणि राजकीय अस्थिरतेच्या काळात प्रत्यक्ष अनुभव घेतला.
advertisement
भारतामध्येही त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये काम केलं असून कलम 370 हटवल्यानंतरच्या सुरक्षाव्यवस्थेत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
स्थानिक पोलीसिंग ते आंतरराष्ट्रीय ऑपरेशन
R&AW मध्ये दाखल होण्याआधी पराग जैन यांनी पंजाब राज्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस पदांवर काम केलं आहे. जसे की चंदीगडचे एसएसपी, लुधियाना परिक्षेत्राचे DIG, तसेच बठिंडा, मानसा आणि होशियारपूर येथेही त्यांनी काम केलं. पंजाबमधील भूमिगत चळवळी आणि सुरक्षेच्या स्थानिक संदर्भांचा त्यांना सखोल अनुभव आहे. जो आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी लढताना उपयोगी ठरतो.
advertisement
1 जानेवारी 2021 पासून त्यांना DGP दर्जा आणि केंद्रातील वरिष्ठ पदासाठी पात्रता देण्यात आली होती.
नियुक्ती का महत्त्वाची आहे?
R&AW च्या नेतृत्वात पराग जैन यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा भारताला अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सीमेपलीकडचा दहशतवाद, खलिस्तान चळवळीचा पुन्हा उद्रेक, चीन-पाकिस्तान यांचं वाढतं समन्वयन आणि हायब्रिड युद्धाचे बदलते तंत्रज्ञान अशा आव्हानांचा देश सामना करत असताना जैन यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
advertisement
पोलिसिंगचा मैदानातील अनुभव, जागतिक गुप्तचर प्रणालीतील कामकाज आणि तांत्रिक टोळधाड नियंत्रण यातलं दुर्मिळ मिश्रण असलेले पराग जैन आता R&AW च्या धोरणांना अधिक धार आणि स्पष्ट दिशा देण्याची अपेक्षा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 28, 2025 5:27 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
Who Is Parag Jain: सिक्रेट मिशनचा बॉस झाला R&AW Chief, गुप्त युद्धाला मिळाला नवा सेनापती; खलिस्तान,पाकिस्तान,चीनचा थरकाप उडवणारा अधिकारी