Dombivli News: रविंद्र चव्हाणांचा यू टर्न, डोंबिवलीत अभिजीत थरवळांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती

Last Updated:

रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे शिंदे- चव्हाण यांच्यातील टोकाची कटुता संपुष्टात आल्याचे समोर आले आहे.

News18
News18
मुंबई :   नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेना शिंदे गटात धुमसत असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे. फोडाफोडीचे राजकारण आणि स्थानिक निवडणुकांवरून निर्माण झालेली कटुता विसरून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण डोंबिवलीत एकाच मंचावर अवतरले. विशेष म्हणजे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी चव्हाण यांचे हस्तांदोलन करत केलेले स्वागत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.आता रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे शिंदे- चव्हाण यांच्यातील टोकाची कटुता संपुष्टात आल्याचे समोर आले आहे.
नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत महायुतीत मोठी ठिणगी पडली होती. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पाडल्याच्या चर्चा होत्या. यामुळे स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाले होते. हा वाद इतका विकोपाला गेला की, हे प्रकरण थेट दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दरबारात पोहोचले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेऊन, हे प्रकरण त्यांच्या कानावर घातल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता या ‘हायव्होल्टेज’ ड्राम्यावर पडदा पडल्याचे दिसत आहे. कारण शिंदे गटातून भाजपमध्ये झालेल्या एका प्रवेशाला रविंद्र चव्हाण यांनी स्थगिती दिली आहे. स्वत: त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे.
advertisement

अभिजीत थरवळ हे 15 वर्षापासून राजकरणात

शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते सदानंद थरवळ यांचे पुत्र अभिजीत थरवळ यांनी शिंदेंची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतले होते. या प्रवेशासाठी स्वत: रविंद्र चव्हाण उपस्थित होते. मात्र प्रवेशानंतर चार दिवसात डोंबिवलीमधील अभिजित थरवळ यांच्या प्रवेशाला स्थगिती देण्यात आली . भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेशास तूर्तास स्थगिती दिल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. अभिजीत थरवळ हे 15 वर्षापासून राजकरणात आहेत. ते युवा सेनेचे पदाधिकारी होते. कल्याण डोंबिवली पालिकेची मागील निवडणूक त्यांनी टिळकनगर प्रभागातून भाजप उमेदवार राजन आभाळे यांच्या विरुद्ध लढवली होती.
advertisement

एकनाथ शिंदेंना भाजपकडून पुन्हा धक्का

महायुतीतील अंतर्गत तणाव शमवण्याच्या उद्देशाने दिल्लीहून 'इनकमिंग बंदी'चा संदेश घेऊन परतलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपकडून पुन्हा धक्का बसला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli News: रविंद्र चव्हाणांचा यू टर्न, डोंबिवलीत अभिजीत थरवळांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement