advertisement

कोल्हापुरात काँग्रेसला पुन्हा जोरदार धक्का, माजी महापौरच फोडल्या, पालिका निवडणुकीपूर्वी हादरा

Last Updated:

Kolhapur Politics: माजी महापौर सई खराडे यांनी यापूर्वी चंद्रेश्वर प्रभागातून दोनवेळा कोल्हापूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व केले आहे.

कोल्हापूर सई खराडे शिवसेना प्रवेश
कोल्हापूर सई खराडे शिवसेना प्रवेश
ठाणे: आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुन्हा एक जोरदार धक्का कॉंग्रेसला दिला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी महापौर सई खराडे आणि शिवाजी पेठ प्रभागातून इच्छुक असणारे त्यांचे चिरंजीव शिवतेज खराडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे भगवा ध्वज देऊन शिवसेनेत स्वागत केले. या पक्ष प्रवेशासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला.
advertisement

कोण आहेत सई खराडे?

माजी महापौर सई खराडे यांनी यापूर्वी चंद्रेश्वर प्रभागातून दोनवेळा कोल्हापूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. त्या माजी कृषी मंत्री कै. श्रीपतराव बोंद्रे यांची पुतणी, जेष्ठ नेते महिपतराव बोंद्रे यांची कन्या, काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभूत झालेले (दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे) उमेदवार सखाराम बापू खराडे यांच्या स्नुषा आहेत.
advertisement

इंद्रजीत आडगुळे कोण आहेत?

तर सई खराडे व अजित खराडे यांचे चिरंजीव शिवतेज खराडे हे सद्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्यासह यांचा जाहीर प्रवेश माजी महापौर कोल्हापूर महानगर पालिका आणि सन १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभूत झालेले (दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे) उमेदवार अॅड. महादेवराव आडगुळे यांचे चिरंजीव व सन २०१० साली महापालिका निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभूत झालेले (दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे) उमेदवार आणि सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत आडगुळे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला. या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. यावेळी माजी आमदार सुजित मिनचेकर हे उपस्थित होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापुरात काँग्रेसला पुन्हा जोरदार धक्का, माजी महापौरच फोडल्या, पालिका निवडणुकीपूर्वी हादरा
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement