advertisement

अंबरनाथ-बदलापूरकरांना लोकलला मिळणार तगडा पर्याय; मुंबई गाठणे होणार अधिक सोपे

Last Updated:

Badlapur To Kanjurmarg Metro Update : अंबरनाथ आणि बदलापूरला जोडणारी मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार आहे. मात्र या मेट्रोबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.

Kalyan Ulhasnagar Ambernath metro extension news
Kalyan Ulhasnagar Ambernath metro extension news
कल्याण : अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या दोन्ही शहरांना जोडणारी मेट्रो सेवा आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असून सध्या या मेट्रोबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे लोकलच्या गर्दीच्या प्रवासातून सुटका मिळणार आहे.
अंबरनाथमार्गे थेट मुंबई गाठणे होणार सोपे
मेट्रो प्रकल्पाचा विस्तार सध्या मुंबई शहरापासून ते अनेक उपनगरापर्यंत विस्तारात आहे. त्यातील एका मेट्रो मार्गिका म्हणजे बदलापूर ते कांजूरमार्ग. पण आता हा विस्तार बदलापूरपर्यंत मर्यादित न राहता थेट टू वे मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे अंबनरनाथपर्यंत जोडला जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचा फायदा फक्त या दोन शहरांपुरता मर्यादित न राहता उल्हासनगर, शहाड आणि विशेषतहा कल्याण शहरालाही होणार आहे.
advertisement
एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रोसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून काटई नाका ते बदलापूर दरम्यान मेट्रोचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे या भागातील प्रवास अधिक सोयीचा आणि जलद होईल.
ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गाला मिळणार नवा विस्तार
याशिवाय ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण करून कल्याणहून उल्हासनगरमार्गे अंबरनाथपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या विस्तारीकरणासाठी 183 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा विकास होणार असून मोठी गृहसंकुले उभी राहण्याची शक्यता आहे.
advertisement
कांजूरमार्ग-काटई नाका-बदलापूर या सुमारे 17 किलोमीटर परिसरातील गावांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होईल. मेट्रो सेवा तळोजाशी जोडली जाणार असल्याने त्या भागातही वेगाने नागरीकरण होईल.
औद्योगिक पट्ट्यातील कामगारांसाठी ही मेट्रो विशेष फायदेशीर ठरणार आहे. अंबरनाथ, आनंदनगर, पालेगाव आणि एमआयडीसी परिसरातील कामगारांना जलद आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल. सध्या रेल्वेवर अवलंबून असलेल्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
अंबरनाथ-बदलापूरकरांना लोकलला मिळणार तगडा पर्याय; मुंबई गाठणे होणार अधिक सोपे
Next Article
advertisement
Grampanchayat Election: गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' तारखांवर ठेवा लक्ष
गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' त
  • राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे.

  • गावगाड्याचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.

  • येत्या २० फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

View All
advertisement