नेरळकरांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वे गेट 4 दिवस राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी रस्ते
Last Updated:
Neral Traffic Update : नेरळ रेल्वे गेट 21 तांत्रिक कामासाठी चार दिवस बंद राहणार आहे. पर्यायी मार्गांवर रस्त्याचे काम चालू असल्याने मोठी वाहतूक कोंडी होईल. स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाय करण्याची मागणी केली आहे.
कल्याण : नेरळ येथील रेल्वे गेट क्रमांक 21 तांत्रिक कामासाठी सलग चार दिवस बंद राहणार आहे असा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.मात्र कोणत्या चार दिवसांत हा बंद राहणार असून वाहनचालकांनी कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर करावा त्याबाबत जाणून घ्या.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालक या निर्णयावर संताप व्यक्त करत आहेत. नेरळ येथील वाहतुकीचा खोळंबा आणि पर्यायी रस्त्यांची खराब स्थिती लक्षात घेता प्रवाशांना दामत रेल्वे गेट ते आंबिवली रेल्वे गेट असा मोठा वळसा घालावा लागणार आहे. विशेष म्हणजे या पर्यायी मार्गांवर सध्या रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी तयार होण्याची शक्यता आहे.
advertisement
गेल्या अनेक वर्षांपासून नेरळ रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. वारंवार रेल्वे गेटमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने स्थानिकांचा संताप अधिक वाढलेला आहे. नागरिक आता रेल्वे प्रशासनाकडून फाटकाचे काम लवकर पूर्ण करावे आणि उड्डाणपुलाबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करत आहेत.
या दिवशी राहणार बंद
view comments6 ते9 जानेवारीदरम्यान सकाळी 8 वाजेपर्यंत या फाटकावरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाही. या निर्णयामुळे नेरळकरांवर आणि प्रवाशांवर मोठा ताण पडला आहे.शिवाय सध्या सलग चार दिवस फाटक बंद राहणार असल्यामुळे स्थानिकांचे दैनंदिन नियोजन कोलमडणार आहे. प्रशासनाने पर्यायी मार्गांची परिस्थिती पाहून आधी नियोजन केले असते तर समस्या इतकी गंभीर होणार नाही होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 1:37 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
नेरळकरांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वे गेट 4 दिवस राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी रस्ते








