advertisement

Dombivli News : दुचाकीस्वाराने ओलांडल्या सर्व सीमा; महिलेसोबत भररस्त्यातच धक्कादायक प्रकार, कारण ठरलं कुत्र्याचं पिल्लू

Last Updated:

Dombivli Crime News : डोंबिवली शहरातून एक महिलेसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरु आहे. नेमकं काय आणि कोणत्या कारणावरुन सर्व घडलं आहे ते जाणून घेऊयात.

News18
News18
डोंबिवली : डोंबिवलीच्या पूर्वेकडील नांदिवली परिसरात एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. श्वानाच्या पिल्लाला धडक दिल्याबाबत विचारणा केल्याने एका दुचाकीस्वाराने 35 वर्षीय महिलेला शिवीगाळ, मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
मुक्या जिवाचा कळवळा पडला महागात
पीडित महिला किराणा सामान घेण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. नांदिवलीतील एका हेअर कटिंग सलूनसमोर एक दुचाकीस्वाराने रस्त्याच्या कडेला बसलेल्या श्वानाच्या पिल्लाला धडक दिली. हे पाहून प्राणिमित्र असलेल्या महिलेने त्या चालकाला जाब विचारला. यावर चालक संतापला आणि त्याने पिल्लाला बॅगने मारहाण केली. ''तुम्हाला काय करायचे आहे? हा तुमच्या घरचा कुत्रा आहे का? मी त्याला मारून टाकेन,'' अशा शब्दांत त्याने महिलेला धमकावले.
advertisement
महिलेने त्याला असे का मारत आहात असे विचारताच आरोपीने तिला शिवीगाळ केली, मारहाण केली आणि तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर प्राणिमित्र अजय मालवणकर यांच्या पुढाकाराने मानपाडा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. तसेच महिलेला मारहाण होत असताना परिसरातील कोणीही मदतीला धावले नाही याबाबतही संताप व्यक्त करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli News : दुचाकीस्वाराने ओलांडल्या सर्व सीमा; महिलेसोबत भररस्त्यातच धक्कादायक प्रकार, कारण ठरलं कुत्र्याचं पिल्लू
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement