advertisement

Sunetra Pawar: पहिलीच DPDC बैठक, अजितदादांच्या स्टाईलने पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Last Updated:

Guardian Minister Sunetra Pawar DPDC Meeting: पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.

सुनेत्रा पवार (पालकमंत्री)
सुनेत्रा पवार (पालकमंत्री)
पुणे : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्रिपद आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली. गुरूवारी पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला पालकमंत्री नात्याने त्यांनी पहिल्यांदाच उपस्थिती लावली. यावेळी अजित पवार यांच्या शैलीतच त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. विकासकामाच्या सद्यस्थितीतबाबत सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पुढील वर्षाचे नियोजन प्राधान्यक्रम ठरवून आत्ता सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार राहुल कुल, आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके, पुणे शहरातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल तसेच विविध विभागाचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. काही लोकप्रतिनिधी दृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे) बैठकीला उपस्थित होते.
advertisement

अजितदादांच्या स्टाईलने पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

अजित पवार हे गुणवत्तापूर्ण विकासकामासाठी आग्रही असायचे. प्रत्यक्ष बांधकामस्थळी जाऊन ते विकासकामांची पाहणी करायचे. कुठे एखादी चूक दिसली तर अभियंता, कंत्राटदारांना ते झाप झाप झापायचे. गुणवत्तापूर्ण कामांच्या बाबतीत ते कुणाचीही हयगय करायचे नाहीत. चुकीचे काम केले तर कुणाचाही मुलाहिजा ते बाळगायचे नाहीत. अजितदादांच्या याच शैलीने आज सुनेत्रा पवार यांनीही अधिकाऱ्यांकडे गुणवत्तापूर्ण कामाचा आग्रह धरला.
advertisement
जिल्ह्याचा विकास हा गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण झाला पाहिजे, अशी स्पष्ट सूचना सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी मंजूर कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे, प्रत्येक बांधकामाचा दर्जा उत्कृष्ट व टिकाऊ ठेवणे आणि पुढील वर्षाचे नियोजन प्राधान्यक्रम ठरवून वेळेत पूर्ण करणे, अशा ठोस सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

गुणवत्तेशी तडजोड न करता विकास झाला पाहिजे

advertisement
पुणे जिल्ह्याचा विकास अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक झाला पाहिजे, याकरिता गुणवत्तेशी तडजोड न करता, जबाबदारीची जाणीव ठेवून व जनतेच्या अपेक्षा केंद्रस्थानी ठेवून आपण पुढे जाऊ, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sunetra Pawar: पहिलीच DPDC बैठक, अजितदादांच्या स्टाईलने पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement