फडणवीसांनी दु:खाचे घोट पिऊन उपमुख्यमंत्रीपद घेतलं; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मंत्रीपद, आमदारकी मिळाली नाही तर नाराज होतात पण फडणवीसांनी दु:खाचे घोट पिऊन उपमुख्यमंत्रीपद घेतलं असं प्रसाद लाड म्हणाले.
प्रमोद पाटील, पेण : रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी रायगडमध्ये सभा घेण्यात आली. यावेळी भाजप नेते प्रसाद लाड यांनी नेत्यांच्या नाराजीवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठं विधान केलंय. मंत्रीपद, आमदारकी मिळाली नाही तर नाराज होतात पण फडणवीसांनी दु:खाचे घोट पिऊन उपमुख्यमंत्रीपद घेतलं असं प्रसाद लाड म्हणाले.
आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं की, आपल्याला मंत्री पद ,आमदारकी नाही मिळाली की नाराज होतो. मात्र फडणवीस यांनी आघाडीचे सरकार पाडले. त्यानंतर भाजप शिवसेनेची सत्ता स्थापन केली आणि दुःखाचे घोट पिऊन उपमुख्यमंत्री पद घेतले. त्यानंतर अजित पवार सत्तेत आले आणि आपल्याकडचे मंत्रीपद त्यांना मिळाले.
अजित पवार उप मुख्यमंत्री झाले,यावेळी फडणवीस खाजगीत आम्हाला सांगताना पाहिले की, मी पूर्ण उप मुख्यमंत्री होतो. आता अर्ध्याचा पाव उप मुख्यमंत्री झालो. हे सर्व त्यांनी कार्यकर्त्यांना होणारा त्रास आणि आपली सत्ता यावेळी म्हणून दुःखाचे घोट घेऊन सहन केले असंही प्रसाद लाड म्हणाले.
advertisement
प्रसाद लाड यांनी उध्दव ठाकरेंचे सरकार असताना आम्हाला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला असाही आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून सांगितले की तुला, मला कधी जेलमध्ये टाकतील. तुला माहित आहे का प्रवीण दरेकर यांची चौकशी लावली. गिरीश महाजनांना अटक करण्याचे काम सुरू आहे. तुला पाचव्या नंबर राहून 35 मते आणून हे सरकार पाडावं लागेल असा गौप्यस्फोट प्रसाद लाड यांनी केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 15, 2024 2:45 PM IST


