मालवणात राडा! निलेश राणे आणि आदित्य ठाकरे आले समोर, कार्यकर्ते आक्रमक

Last Updated:

राजकोट किल्ल्यावर जिथं पुतळा पडला त्याठिकाणी मविआ आणि महायुतीचे नेते आमने सामने आल्यानं राडा झाला. यावेळी तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं.

News18
News18
मालवण : मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून मोर्चा काढण्यात येत आहे. यावेळी राजकोट किल्ल्यावर जिथं पुतळा पडला त्याठिकाणी मविआ आणि महायुतीचे नेते आमने सामने आल्यानं राडा झाला. यावेळी तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं. आदित्य ठाकरेंना बाहेर जाऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका राणे समर्थकांनी घेतली. यावर आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, त्यांचा गैरसमज आहे, त्यांना वाटतं आम्ही कोंबडे वगैरे सोबत आणलेत, पण आम्ही चोर वाटेने जाणार नाही अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी टीका केली. (Malvan Shivaji Maharaj Statue)
राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी निलेश राणे, नारायण राणे आणि आदित्य ठाकरे एकाच वेळी आल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजपचे कार्यकर्ते याठिकाणी आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला मविआचे नेते एकत्र आले होते. राणेंना अडवण्यात आलं. दोरी लावून त्यांना रोखल्यानं नारायण राणेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर धावूनही गेले. आम्ही स्थानिक आहोत, हे कशाला लावलंय आमच्याकडे, त्यांच्याकडे कुठे आहे, हे चालणार नाही, खाली घ्या हे असं म्हणत दोरी काढण्यासाठी निलेश राणे आक्रमक झाले.
advertisement
एका बाजूला राणेंना अडवले असताना दुसऱ्या बाजूने पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुसऱ्या बाजूने वाट काढत बाहेर पडणं पसंद केलं. तर आदित्य ठाकरे यांनी ठिय्या मांडला होता. आदित्य ठाकरे आणि मविआचे नेते किल्ल्यावर दाखल झाले तेव्हा भाजपचे कार्यकर्ते आक्रकम झाले.
भ्रष्टाचार, नाकर्तेपणा हे सगळं उघड झालंय, त्यामुळे सरकारची बाजू चिडलेली दिसत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. वाद निर्माण करण्याची गरज नाहीय. दुर्घटना घडलीय ती बघायला वेगवेगळ्या पक्षाचे नेते येतायत. त्यांच्याशी स्थानिक नेत्यांनी वाद घालणं योग्य नाही असं म्हणत राणेंवर टीका केली.
advertisement
राणे आणि आदित्य एकाच वेळी पोहोचले. यात पोलीस प्रशासनाला यात दोष देण्यात अर्थ नाही. ही जागा वादाची नाही. शिवाजी महाराजाचा पुतळा पडला, ही दु:खदायक घटना आहे आणि अशावेळी स्थानिकांनी असं वागणं हे योग्य नाही अशा शब्दात जयंत पाटील यांनी निलेश राणेंना सुनावलं.
view comments
मराठी बातम्या/कोकण/
मालवणात राडा! निलेश राणे आणि आदित्य ठाकरे आले समोर, कार्यकर्ते आक्रमक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement