Sushama Andhare Helicopter Crash अपघात की घातपात? सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

Sushama Andhare Helicopter Crash : लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रचारला वेग आला आहे. ठाकरे गटाची महाडमध्ये काल प्रचारसभा झाली. या सभेला शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या.

हेलिकॉप्टर सुषमा अंधारे यांच्यासमोरच क्रॅश झालं. हेलिकॉप्टरचे तुकडे झाले आहेत. या हेलिकॉप्टरमधून पायलटला सुखरुप बाहेर काढण्यात आलं.
हेलिकॉप्टर सुषमा अंधारे यांच्यासमोरच क्रॅश झालं. हेलिकॉप्टरचे तुकडे झाले आहेत. या हेलिकॉप्टरमधून पायलटला सुखरुप बाहेर काढण्यात आलं.
प्रमोद पाटील, रायगड : लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रचाराला वेग आला आहे. ठाकरे गटाची महाडमध्ये काल प्रचारसभा झाली. या सभेला शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या. महाडच्या सभेनंतर आज सकाळी त्या बारामतीला हेलिकॉप्टरने जाणार होत्या. दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणीही जिवीतहानी झालेली नाही. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सुषमा अंधारे आपला रायगड दौरा आटोपून बारामती दौऱ्यावर निघाल्या होत्या. त्यासाठी हेलिपॅडजवळ त्या पोहोचल्या होत्या आणि हेलिकॉप्टरची वाट पाहत होत्या. हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरत असतानाच क्रॅश झालं. यावेळी सुषमा अंधारे त्यांच्या फेसबूक पेजवर लाइव्ह करत होत्या. त्यामध्ये हेलिकॉप्टर क्रॅशची घटना शूट झाली आहे. हेलिकॉप्टर क्रॅश झालं तेव्हा पायलटने प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडून स्वत:चा जीव वाचवला.
advertisement
महाडमध्ये काल रात्री महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांची प्रचार सभा आटोपून आज सकाळी सुषमा अंधारे या बारामती येथे मेळाव्यासाठी जाणार होत्या. एका खाजगी मैदानावर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर एक दोन गिरट्या घालून कोसळले हे सर्व सुषमा अंधारे यांच्यासमोरच घडले.
advertisement
दरम्यान, या अपघातामध्ये हेलिकॉप्टरचे पायलट आणि त्यांचा सहकारी हे सुखरूप आहेत. तसेच सुषमा अंधारे याही सुखरूप आहेत. याबाबत सुषमा अंधारे यांच्याशी संपर्क साधला असता हा घातपात होता का? असे विचारले असता सध्या तरी मी या विषयावर बोलणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
view comments
मराठी बातम्या/कोकण/
Sushama Andhare Helicopter Crash अपघात की घातपात? सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement