advertisement

या 10 वर्षात जन्मलेल्या 1.56 कोटी लोकांवर मृत्यूची टांगती तलवार, नव्या संशोधनामुळे खळबळ

Last Updated:

Stomach Cancer Research : यापैकी बहुतेक प्रकरणं आशियाई देशांमध्ये असतील. 16.5 लाख लोक तर भारतातीलच असतील, असं संशोधनात म्हटलं आहे. आता नेमकं असं काय घडणार आहे, कोणतं संकट आहे याबाबत तुमच्याही मनात भीती झाली असेल.

News18
News18
नवी दिल्ली : मृत्यू कधी कुठे कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. आता एका नव्या संशोधनाने तर खळबळच उडवली आहे. 10 वर्षांत जन्मलेल्या लोकांवर मृत्यूची टांगती तलवार आहे. 1.56 कोटींहून अधिक लोकांवर मोठं संकट असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. यापैकी बहुतेक प्रकरणं आशियाई देशांमध्ये असतील. 16.5 लाख लोक तर भारतातीलच असतील, असं संशोधनात म्हटलं आहे. आता नेमकं असं काय घडणार आहे, कोणतं संकट आहे याबाबत तुमच्याही मनात भीती झाली असेल.
गेल्या काही महिन्यांत हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची कितीतरी प्रकरणं समोर आली आहेत. अगदी हसता, बोलता, नाचता, गाता, चालता, उठता, बसता, जिम करताना अगदी निरोगी माणसांनाही हार्ट अटॅक आल्याने याबाबत भीती निर्माण झाली. आता नव्या अभ्यासाने तर कोट्यवधी लोकांची झोप हिरावून घेतली आहे. हे संशोधन आहे ते कॅन्सरबाबतचं. हे संशोधन नेचर मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे.
advertisement
शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की 2008 ते 2017 दरम्यान जन्मलेल्या 1.56 कोटींहून अधिक लोकांना भविष्यात गॅस्ट्रिक कॅन्सर होण्याचा धोका आहे. ज्याला स्टमक कॅन्सर म्हणजे पोटाचा कर्करोगही म्हणतात. यापैकी बहुतेक प्रकरणं आशियाई देशांमध्ये असतील. जागतिक आकडेवारीनुसार पोटाच्या कर्करोगाचा धोका असलेल्या 1.56 कोटी लोकांपैकी सुमारे 60% प्रकरणं फक्त आशियामध्ये असतील. 65 लाख नवीन प्रकरणं केवळ भारत आणि चीनमध्ये अपेक्षित आहेत. संशोधनानुसार भारतात या काळात जन्मलेल्या सुमारे 16.5 लाख लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी पोटाचा कर्करोग होऊ शकतो.
advertisement
गॅस्ट्रिक कॅन्सर कसा होतो, त्याची लक्षणं काय?
हेल्थलाइनमध्ये दिलेल्या माहितीनुसार गॅस्ट्रिक कॅन्सर हा एक घातक कर्करोग आहे जो पोटाच्या आतील थराच्या पेशींमध्ये होतो. तो सहसा हळूहळू विकसित होतो आणि सुरुवातीला लक्षणं दिसत नाही. भूक न लागणं, छातीत जळजळ, अपचन किंवा अचानक वजन कमी होणं यासारखी लक्षणं नंतर दिसू लागतात.
advertisement
या कर्करोगाचे मुख्य कारण हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचा बॅक्टेरिया आहे. ET च्या अहवालानुसार, एका नवीन अभ्यासात असं दिसून आलं आहे की पोटाच्या कर्करोगाच्या 76% प्रकरणं हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतात. हा एक सामान्य बॅक्टेरिया आहे जो पोटात राहतो, पण जर तो बराच काळ टिकला तर तो संसर्ग निर्माण करतो. नंतर तो कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो. धूम्रपान, जास्त मीठयुक्त आहार, मद्यपान, अनुवांशिक कारणं आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती हे देखील त्याचे जोखीम घटक आहेत.
advertisement
यापासून कसं वाचायचं?
नवीन संशोधनात असंही म्हटलं आहे की जर सध्याच्या परिस्थितीत कोणताही बदल केला नाही तर येत्या काळात मृत्यूदर आणि रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागेल. विशेषतः तरुण पिढी आणि वृद्ध लोकसंख्येमध्ये कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने हा धोका आणखी वाढू शकतो. अभ्यासानुसार, सध्या उप-सहारा आफ्रिकेत पोटाच्या कर्करोगाचे रुग्ण कमी असले तरी, भविष्यात तेथील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. 2022 पेक्षा सहा पट जास्त रुग्ण असू शकतात. याचा अर्थ असा की प्रत्येक देशाला आतापासूनच तयारी करावी लागेल, जेणेकरून भावी पिढ्यांना या प्राणघातक आजारापासून वाचवता येईल. भारतातही या कर्करोगाला रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची गरज आहे.
advertisement
जर वेळेवर ओळख पटवून उपचार केले नाहीत तर हा कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरू शकतो, म्हणून लवकर निदान आणि प्रतिबंध करणं खूप महत्त्वाचं आहे. संशोधन शास्त्रज्ञांनी शिफारस केली आहे की पोटाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी, हेलिकोबॅक्टर पायलोरीची मोठ्या प्रमाणात तपासणी आणि उपचारांवर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे. जर हे उपाय गांभीर्याने अंमलात आणले गेले तर असा अंदाज आहे की पोटाच्या कर्करोगाचे रुग्ण 75% पर्यंत कमी होऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
या 10 वर्षात जन्मलेल्या 1.56 कोटी लोकांवर मृत्यूची टांगती तलवार, नव्या संशोधनामुळे खळबळ
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement