advertisement

Raw Paneer Benefits : ब्लड प्रेशरपासून ते त्वचेपर्यंत, कच्च पनीर खाल्ल्याने शरीराला मिळतात 5 फायदे

Last Updated:

पनीर वापरून भाजी, पकोडे इत्यादी बनवले जातात, परंतु तुम्हाला माहितीये का कच्चे पनीर सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

कच्च पनीर खाल्ल्याने शरीराला मिळतात 5 फायदे
कच्च पनीर खाल्ल्याने शरीराला मिळतात 5 फायदे
पनीर हे शाकाहारी लोकांचे आवडते खाद्य असून ते शरीरासाठी देखील फायदेशीर ठरते. पनीरमध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम सारखे पोषकतत्व आढळतात. पनीर वापरून भाजी, पकोडे इत्यादी बनवले जातात, परंतु तुम्हाला माहितीये का कच्चे पनीर सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
पचनासाठी उत्तम : पोटासाठी तसेच पचनक्रियेसाठी कच्च पनीर फायदेशीर मानलं जात. कच्च पनीर खाल्ल्याने बद्धकोष्ठता तसेच पोटाशी निगडित विविध समस्या दूर होतात. दररोज कच्च पनीर खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि अनेक आजारांपासून देखील शरीर दूर राहते.
ब्लड प्रेशर नियंत्रणात येते : पनीरमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी चांगल्या प्रमाणात आढळते. तेव्हा शरीरात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी पुरेशा प्रमाणात असतील तर ब्लड प्रेशरची समस्या दूर होऊ शकते. ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी आहारात कच्च्या पनीरचे सेवन करावे यामुळे बीपी नियंत्रणात येऊ शकेल.
advertisement
त्वचेसाठी फायदेशीर : पनीरमध्ये भरपूर पोषकतत्व असतात जे आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील उत्तम मानले जातात. पनीर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि अँटी ऑक्सीडेंट्सने भरपूर असते ज्यामुळे त्वचेशी निगडित समस्या दूर होतात. दररोज पनीर खाल्ल्याने त्वचा चांगली राहते.
advertisement
हाडांसाठी उपयुक्त : पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फोरस भरपूर प्रमाणात आढळते. पनीरमध्ये कॅल्शियम असल्याने हाड मजबूत होण्यास मदत होते तसेच गुडघे दुखी देखील दूर होते.
एनर्जी मिळते : पनीरमध्ये विविध प्रकारे प्रोटीन आढळते, ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तेव्हा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही कच्च्या पनीरचे सेवन करू शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Raw Paneer Benefits : ब्लड प्रेशरपासून ते त्वचेपर्यंत, कच्च पनीर खाल्ल्याने शरीराला मिळतात 5 फायदे
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement