Romantic Places : पावसाळ्यात पार्टनरसोबत 'या' 5 रोमँटिक ठिकाणी जा, प्रत्येक क्षण बनेल अविस्मरणीय आणि खास!

  • Published by:
Last Updated:

Best Romantic Places To Visit In Monsoon : हिरवळ, थंडगार हवा आणि रिमझिम पावसाच्या सरींमध्ये जर तुमचा पार्टनर सोबत असेल, तर त्या क्षणाचा आनंद काही वेगळाच असतो. जुलै महिना रोमांससाठी सर्वोत्तम मानला जातो.

पावसाळ्यात भेट देण्यासाठी रोमँटिक ठिकाणे
पावसाळ्यात भेट देण्यासाठी रोमँटिक ठिकाणे
मुंबई : पावसाळा सुरू होताच मनाला एक शांत आणि तितकाच चैतन्यपूर्ण अनुभव हवा असतो. हिरवळ, थंडगार हवा आणि रिमझिम पावसाच्या सरींमध्ये जर तुमचा पार्टनर सोबत असेल, तर त्या क्षणाचा आनंद काही वेगळाच असतो. जुलै महिना रोमांससाठी सर्वोत्तम मानला जातो. अशा वेळी, जर तुम्हालाही हा ऋतू खास बनवायचा असेल, तर काही निवडक ठिकाणी नक्की भेट द्या.
ही ठिकाणे फक्त सुंदरच नाहीत, तर येथील हवामान आणि वातावरण तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला एकमेकांच्या अधिक जवळ आणू शकते. चला जाणून घेऊया पावसाळ्यात फिरण्यासाठी भारतातील काही उत्तम रोमँटिक ठिकाणांबद्दल..
महाबळेश्वर, महाराष्ट्र..
पर्वतांची राणी म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात येथील हिरवळ आणि हवामान इतके सुंदर असते की, जोडपी दरवर्षी येथे सुट्ट्या घालवण्यासाठी येतात. धबधबे, तलाव आणि उंच पर्वतांमध्ये वेळ घालवणे एक वेगळाच अनुभव देतो.
advertisement
फिरण्याची ठिकाणे : वेण्णा तलाव, लिंगमाळा धबधबा, आर्थर सीट
गोकर्ण, कर्नाटक..
जर तुम्ही गर्दीपासून दूर एका शांत आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्याच्या शोधात असाल, तर गोकर्ण अगदी योग्य ठिकाण आहे. येथील साधेपणा, स्वच्छ हवा आणि निळा समुद्र तुम्हाला आरामशीर अनुभव देतो. किनाऱ्यावर हातात हात घालून फिरणे आणि लाटांचा आवाज ऐकणे, हे प्रत्येक कपलचे स्वप्न असते.
advertisement
फिरण्याची ठिकाणे : ओम बीच, हाफ मून बीच, गोकर्ण बीच
उदयपूर, राजस्थान..
जर तुम्हाला राजेशाही थाट आणि तलावांचे संगम हवे असेल, तर उदयपूरला भेट द्या. येथे पावसाळ्यात तलाव आणि राजवाडे आणखी सुंदर दिसू लागतात. रोमँटिक डिनर असो किंवा नौकाविहार, उदयपूर जोडप्यांसाठी सर्वोत्तम आहे.
फिरण्याची ठिकाणे : सिटी पॅलेस, फतेहसागर तलाव, पिछोला तलाव
advertisement
ऋषिकेश, उत्तराखंड..
जर तुम्हाला साहसासोबत शांतताही हवी असेल, तर ऋषिकेशला नक्की जा. पावसाळ्यात गंगेच्या काठी बसणे आणि पर्वतांचे नयनरम्य दृश्य पाहणे एक सुखद अनुभव आहे. येथील योग आणि ध्यानधारणेचे वातावरणही मनाला शांती देते.
फिरण्याची ठिकाणे : लक्ष्मण झुला, त्रिवेणी घाट, परमार्थ निकेतन
लोणावळा, महाराष्ट्र..
मुंबई आणि पुणे दरम्यान वसलेले हे हिल स्टेशन पावसाळ्यात एखाद्या नंदनवनापेक्षा कमी वाटत नाही. धबधबे, हिरवळ आणि रोमँटिक दऱ्या जोडप्यांना वारंवार येथे आकर्षित करतात.
advertisement
फिरण्याची ठिकाणे : पावना तलाव, लायन्स पॉइंट, टेबल टॉप
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Romantic Places : पावसाळ्यात पार्टनरसोबत 'या' 5 रोमँटिक ठिकाणी जा, प्रत्येक क्षण बनेल अविस्मरणीय आणि खास!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement