snake: घरात ठेवता येतं का सर्पदंशावरची औषधं? किती असते किंमत, खरंच उपयोग होतो का?
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
सर्पदंशानंतर स्नेक अँटी व्हेनम इंजेक्शन दिलं जातं. हे एक प्रिस्क्रिप्शन औषध आहे. सर्पदंशावर ते सर्वांत प्रभावी औषध असतं.
मुंबई: लॅटिन देश आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागातले नागरिक अँटी स्नेक व्हेनम इंजेक्शन घरात ठेवतात. सर्पदंश झाल्यास तात्काळ त्याचा वापरदेखील करतात. त्यामुळे यांपैकी काही देशांमध्ये सर्पदंशाच्या अनेक घटना घडत असल्या तरी त्यात मृत्यूचं प्रमाण खूपच कमी आहे. अँटी स्नेक बायटिंग औषध कोणतं, ते तुम्ही घरात ठेवू शकता का, त्याची किंमत किती असते, याविषयी तुम्हाला माहिती आहे का?
सर्पदंशानंतर स्नेक अँटी व्हेनम इंजेक्शन दिलं जातं. हे एक प्रिस्क्रिप्शन औषध आहे. सर्पदंशावर ते सर्वांत प्रभावी औषध असतं. यात चार प्रकारच्या विषांचं मिश्रण असतं. ते सापांचं विष निष्प्रभ करतं. त्यामुळेच विषारी साप चावल्यानंतरही त्या व्यक्तीला जीवनदान मिळतं.
लॅटिन देश आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागांत प्रत्येकाला सर्पदंशावरचं इंजेक्शन देण्याचं, तसंच त्याचं व्यवस्थापन करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. यामुळे संबंधित व्यक्ती इतकी निपुण होते, की ती पीडित व्यक्तीला या औषधाचा डोस लगेच देऊ शकते.
advertisement
स्नेक अँटी व्हेनम इंजेक्शन दिल्यावर संबंधित रुग्णामध्ये अॅनाफिलेक्सिससारखे (तीव्र अॅलर्जिक दुष्परिणाम) जीवघेणे दुष्परिणाम दिसू शकतात. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेलं जातं आणि त्याला निरीक्षणाखाली ठेवलं जातं.
कोणत्या औषधाचा होतो भारतात जास्त वापर
अनेक देश अँटी व्हेनम उत्पादित करतात. त्यात अर्जेंटिना, बोलिव्हिया, ब्राझील, कोलंबिया, पेरू, व्हेनेझुएलासारखे दक्षिण अमेरिकी देश आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. भारताविषयी बोलायचं झालं तर सात फार्मास्युटिकल प्रयोगशाळांमध्ये देशातल्या सर्वात धोकादायक अशा चार सापांच्या दंशावर अँटी व्हेनम तयार केलं जातं. त्यात कोब्रा, कॉमन क्रेट, रसेल व्हायपर आणि सॉ-स्केल्ड व्हायपर या सर्पांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे इंजेक्शन या चार धोकादायक सापांच्या विषापासून तयार केलं जातं. देशातली रुग्णालयं प्रामुख्याने याच अँटी व्हेनमचा वापर करतात.
advertisement
अँटी व्हेनम औषधं घरात ठेवता येतात का ?
हो. ठेवता येतात. काही प्रकारच्या सर्पदंशावरची औषधं घरी ठेवता येतात; पण ती व्यवस्थित ठेवावी लागतात. ही औषधं 8 अंश सेल्सिअस तापमानात ठेवावी लागतात. जर तुम्ही असं औषध घरात ठेवणार असाल तर ते या तापमानात पाच वर्षांपर्यंत ठेवता येतं. कोरडं अँटी सिरम थंड आणि प्रकाश जेमतेम असलेल्या जागेत ठेवावं. एक औषध पावडर स्वरूपात मिळतं. ते थंड ठिकाणी ठेवू शकता. गरज पडल्यास त्यात द्रव मिक्स करून त्याचा वापर करता येतो.
advertisement
सर्पदंशावरच्या औषधाची किंमत किती असते?
- हे औषध बाजारात वेगवेगळ्या किमतीला मिळतं; पण ऑनलाइन मिळणाऱ्या औषधांच्या किमती पाहिल्या तर त्या 550 रुपयांपासून ते 10,000 रुपयांपर्यंत असतात. सापाच्या विषापासून बचाव करणारी सर्वांत स्वस्त औषधं भारतात मिळतात. अमेरिका आणि मेक्सिकोत सर्पदंशावर उपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या अनेक इंजेक्शनची किंमत एक लाख रुपयांच्या आसपास असते. भारतात एका रुग्णासाठी अँटी व्हेनमच्या 20 कुपी वापरून उपचार करण्यासाठी सुमारे 70 डॉलर अर्थात 5278 रुपये खर्च येतो.
advertisement
सर्पदंशाचा शरीरावर कसा परिणाम होतो?
- ज्या ठिकाणी सर्पदंश झाला आहे, तिथं सूज येते आणि ऊतींचं नुकसान होतं.
- रुग्णाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात.
- विषाचा परिणाम मज्जासंस्थेवर होऊन स्ट्रोकसारखी लक्षणं दिसतात.
- स्नायूंवर दुष्परिणाम दिसतो.
सर्पदंश झाल्यावर कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
- जखम कापू नका.
-विष शोषण्याचा प्रयत्न करू नका.
- जखमेवर बर्फ लावू नका. तसंच त्याला पाणी लागू देऊ नका.
advertisement
- मद्यपान करू नका.
- कॅफिनयुक्त पदार्थ टाळा.
- इबुप्रोफेन किंवा अॅस्पिरिनसारखी वेदनाशामक औषधं घेऊ नका.
सर्पदंशानंतर रुग्ण बरा व्हायला किती कालावधी लागतो?
- रुग्ण बरा होण्याचा कालावधी हा त्याला कोणत्या सर्पानं दंश केला आहे, यावर अवलंबून असतो. पूर्ण बरं वाटायला काही आठवडे ते काही महिने लागू शकतात. काही जणांना यापेक्षा जास्त कालावधीही लागू शकतो.
advertisement
बऱ्याचदा अँटी व्हेनमच्या 19 ते 20 कुपी वापरून सातत्याने इंजेक्शन का द्यावं लागतं?
- साप जास्त विषारी असेल तर अँटी व्हेनमदेखील जास्त लागतं. कारण प्रत्येक डोसमध्ये अँटी बॉडीची संख्या कमी होऊ शकते. कोणत्या सापानं दंश केला आहे, त्यानुसार एक ते 20 कुप्यांचा वापर करून अँटी व्हेनम द्यावं लागतं. अमेरिकेतल्या काही केसेसमध्ये 100 कुपींचादेखील वापर करावा लागला होता. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेतल्या एका अभ्यासानुसार, सर्पदंश झालेल्या प्रत्येक व्यक्तीला पाच कुपी अँटी व्हेनम दिलं गेलं; पण काही रुग्णालयांमध्ये हा आकडा प्रति रुग्ण 19 कुपी होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 13, 2024 8:09 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
snake: घरात ठेवता येतं का सर्पदंशावरची औषधं? किती असते किंमत, खरंच उपयोग होतो का?