advertisement

Moong Dal Idli : पीठ आंबवण्याची झंझटच नाही; बनवा हेल्दी-टेस्टी मुगडाळ इडली, शेफ कुणाल कपूरची सोपी रेसिपी!

Last Updated:

Chef Kunal Kapoor Moong Dal Idli Recipe : सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाऊंटवर मूग डाळ इडलीची रेसिपी शेअर केली आहे. या रेसिपीचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये तुम्ही अनेक भाज्याही घालू शकता.

शेफ कुणाल कपूर मुगडाळ इडली रेसिपी
शेफ कुणाल कपूर मुगडाळ इडली रेसिपी
मुंबई : इडली डोसा हे साऊथ इंडियन पदार्थ बऱ्याच लोकांना आवडतात. ते नाश्त्यासाठी खुप चांगला असतात. मात्र ते घरी बनवायचे म्हणल्यास खूप वेळ आणि मेहनत लागते. अशावेळी त्याचे काही सोपे आणि झटपट बनणारे पर्यंत उपलब्ध असले तर? तर निश्चितच ते बनवणे आपल्याला कंटाळवाणे वाटणार नाही आणि पण आपल्या आवडत्या नाश्त्याचा आनंद घेऊ शकू.
सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाऊंटवर मूग डाळ इडलीची रेसिपी शेअर केली आहे. या रेसिपीचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये तुम्ही अनेक भाज्याही घालू शकता. ज्यामुळे ही इडली आणखीच हेल्दी बनते आणि मुलंही भाज्यांसह ही इडली आवडीने खातात. चला पाहूया ही सहज सोपी इडली कशी बनवायची.
मुगडाळ इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य
भिजवलेली पिवळी मुगडाळ - 1 कप
advertisement
दही - 1/4 cup
बारीक चिरलेले आले - 1/2 इंच
चिरलेली हिरवी मिरची - 2
कढीपत्ता
मीठ - 1 टीस्पून
पाणी - साधारण 3/4 कप
चिरलेले गाजर - 1/3 कप
चिरलेली कोथिंबीर
बेकिंग सोडा किंवा इनो - 1 टीस्पून
तडक्यासाठी लागणारे साहित्य
तेल - 2 टेबल स्पून
हींग - 1/2 टीस्पून
advertisement
मोहरी - 1 टीस्पून
हळद - 1/2 टीस्पून
मुगडाळ इडली बनवण्याची कृती..
- सर्वात आधी पिवळी म्हणजेच विना सालीची मुगडाळ रात्रभर भिजवून ठेवा.
- भिजवलेली मुगडाळ घ्या आणि यामध्ये थोडे दही घाला. दही त्वरित आंबण्याच्या प्रक्रियेस मदत करते.
- आता यामध्ये आले, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि मीठ घालून पाण्याशिवाय बारीक पेस्ट बनवा.
advertisement
- यानंतर मिश्रण खूप घट्ट असल्यास त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून ते आणखी वाटून घ्या. मिश्रण इडलीसाठी योग्य तितके घट्ट आणि पातळ असावे.
- आता या इन्स्टंट इडलीमध्ये साधे टेम्परिंग घाला. यासाठी गरम तेलात हिंग आणि मोहरी घाला आणि नंतर थोडी हळद घाला. इडलीच्या पीठात हे टेम्परिंग घाला.
- तुम्ही मुगडाळ इडलीच्या बॅटरमध्ये हव्या त्या भाज्या घालू शकता. यामध्ये बारीक चिरलेली गाजर आणि कोथिंबीर घाला.
advertisement
- शेवटी, इडलीच्या पीठात थोडा बेकिंग सोडा किंवा एनो घाला. हे दह्यासोबत प्रकटीया करते आणि आंबते. यामुळे इडल्या अगदी फ्लफी आणि मऊ बनतात.
- आता इडलीच्या साच्यांना तेल लावून घ्या. त्यात इडलीचे बॅटर घाला आणि 12 ते 15 मिनिटे वाफवून घ्या.



 










View this post on Instagram























 

A post shared by Kunal Kapur (@chefkunal)



advertisement
या पद्धतीने तुम्ही कमी वेळेत हेल्दी आणि टेस्टी इडली तयार करू शकता. मुलं मुगडाळ किंवा भाज्या खात नसल्यास त्यांना ते खाऊ घालण्याचा उत्तम मार्ग आहे. ही रेसिपी पारंपरिक इडलीच्या रेसिपीपेक्षा सोपी आणि झटपट बनावरी आहे. फक्त तुम्हाला आदल्या दिवशी डाळ भिजवावी लागेल एवढंच.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Moong Dal Idli : पीठ आंबवण्याची झंझटच नाही; बनवा हेल्दी-टेस्टी मुगडाळ इडली, शेफ कुणाल कपूरची सोपी रेसिपी!
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement