Chuttney Without Coconut : घरच्या घरी तयार करा नारळाशिवाय चटणी; इडली, डोशाचा स्वाद होईल डबल

Last Updated:

आज आम्ही तुम्हाला अशा काही चटणीच्या रेसिपीज सांगणार आहोत, ज्या तुम्ही नारळाशिवाय देखील बनवू शकता. या चटन्या चवदार असून आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येतात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारतीय जेवण म्हटलं की थाळी चटणीशिवाय अपूर्ण वाटते. गरमागरम डोसा, इडली किंवा वडा असो बाजूला असलेली चटकदार चटणी जेवणाचा स्वाद दुप्पट करते. पण ही चटणी नारळापासून बनवली जाते. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असली तरी त्यात एक गोष्ट कॉमन अशते ती म्हणजे नारळ. अनेकांना तर असं वाटतं की नारळाशिवाय चटणी बनूच शकत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही चटणीच्या रेसिपीज सांगणार आहोत, ज्या तुम्ही नारळाशिवाय देखील बनवू शकता. या चटन्या चवदार असून आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येतात.

शेंगदाण्याची चटणी

लागणारे साहित्य
½ कप शेंगदाणे, ½ कप भाजलेली चणा डाळ, ४ हिरव्या मिरच्या, थोडं आलं, ½ चमचा मीठ, ½ कप पाणी
फोडणीसाठी
३ चमचे तेल, ½ चमचा मोहरी, ½ चमचा उडीद डाळ, १ सुकी लाल मिरची, काही कढीपत्त्याची पानं
कृती
कढईत शेंगदाणे मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून थंड होऊ द्या. त्याच कढईत भाजलेली चणा डाळ हलकी खमंग होईपर्यंत परतून घ्या. मिक्सरमध्ये शेंगदाणे, चणा डाळ, हिरव्या मिरच्या, आलं, मीठ आणि थोडं पाणी घालून बारीक वाटा. आवश्यक असल्यास थोडं पाणी वाढवा. छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, उडीद डाळ, सुक्या लाल मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करा. ही फोडणी चटणीवर टाकून चांगलं मिसळा.
advertisement

कांदा-टोमॅटो चटणी

लागणारं साहित्य
१ मोठा कांदा (मोठ्या तुकड्यांमध्ये चिरलेला), २ टोमॅटो (मोठ्या तुकड्यांमध्ये चिरलेले), १ इंच आलं, २ लसूण पाकळ्या, ४ सुक्या लाल मिरच्या, १ मोठा चमचा उडीद डाळ, १ मोठा चमचा चणा डाळ, थोडा चिंचेचा गर, ½ चमचा मीठ, ½ कप पाणी
फोडणीसाठी
२ चमचे तेल, ½ चमचा मोहरी, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या
advertisement
कृती
कढईत तेल गरम करून उडीद डाळ, चणा डाळ आणि सुक्या लाल मिरच्या परता. दाळं सोनेरी होऊ लागली की त्यात कांदा, आलं आणि लसूण घालून थोडं भाजा. नंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परता. गॅस बंद करून थोडं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये चिंच, मीठ, पाणी घालून वाटा. तयार चटणीवर फोडणी करून सर्व्ह करा.
advertisement
या दोन्ही चटणी डोसा, इडली, वडा किंवा स्नॅक्ससोबत सर्व्ह केल्या की रोजच्या जेवणात नवा स्वाद आणतात आणि खाण्याचा आनंद दुप्पट करतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Chuttney Without Coconut : घरच्या घरी तयार करा नारळाशिवाय चटणी; इडली, डोशाचा स्वाद होईल डबल
Next Article
advertisement
Mumbai : कबुतरं मुंबईचं राजकारण तापवणार! गोरक्षक प्रमाणे कबुतर रक्षक तयार करणार, जैन धर्मगुरुंची घोषणा
कबुतरं राजकारण तापवणार! गोरक्षक प्रमाणे कबुतर रक्षक , जैन धर्मगुरुंची घोषणा
  • कबुतरं राजकारण तापवणार! गोरक्षक प्रमाणे कबुतर रक्षक , जैन धर्मगुरुंची घोषणा

  • कबुतरं राजकारण तापवणार! गोरक्षक प्रमाणे कबुतर रक्षक , जैन धर्मगुरुंची घोषणा

  • कबुतरं राजकारण तापवणार! गोरक्षक प्रमाणे कबुतर रक्षक , जैन धर्मगुरुंची घोषणा

View All
advertisement