advertisement

Health Tips : अश्वगंधा वनस्पतीचे गुणधर्म वाचून तुम्हीही व्हाल थक्क, 'या' आजारांवर ठरते रामबाण

Last Updated:

अश्वगंधा या वनस्पतीचा उपयोग अनेक प्रकारे होतो. त्यात पोषक घटक मोठ्या प्रमाणावर असतात.

अश्वगंधा
अश्वगंधा
आपल्या आजूबाजूच्या परिसरात, तसंच जंगलातही अशी अनेक झाडं आणि वनस्पती असतात, की ज्यांच्यात खूप औषधी गुणधर्म असतात. त्यातली एक महत्त्वाची वनस्पती म्हणजे अश्वगंधा. या वनस्पतीचं औषधी महत्त्व प्राचीन काळापासून ज्ञात असून, साहजिकच तिचा वापर त्या दृष्टीने केला जातो. अलीकडच्या काळात अनेक जण ही वनस्पती आपल्या घराच्या परिसरातही वाढवण्याचा प्रयत्न करतात. अश्वगंधा या वनस्पतीचा उपयोग अनेक प्रकारे होतो. अनेक आता या वनस्पतीची शेतीही करू लागले आहेत. त्यात पोषक घटक मोठ्या प्रमाणावर असतात.
आयुर्वेदीय डॉक्टर मनीष कुमार गहलोत यांनी सांगितलं, की अश्वगंधा ही खूपच प्रसिद्ध अशी औषधी वनस्पती आहे. गेल्या 10 वर्षांत या वनस्पतीला असलेली मागणी वाढली आहे. अश्वगंधा वनस्पती हिरव्या रंगाची असते. तिचं रोप दीड फुटांपर्यंत असतं. त्याचं फूल फिकट नारिंगी रंगाचं असतं. अश्वगंधाची झाडं राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या भागांत आढळतात. रोप बाजारात 50 ते 70 रुपयांना उपलब्ध असतं.
advertisement
अश्वगंधाचं सेवन अनेक प्रकारे केलं जातं. अश्वगंधाची पानं सुकवून पावडरच्या रूपात त्यांचा वापर केला जातो. तसंच, अश्वगंधाचं तेल काढूनही त्याचा वापर केला जातो. अश्वगंधाच्या तेलाने शरीराला खूप आराम पडतो. वर्षाच्या कोणत्याही काळात याचं सेवन करता येऊ शकतं. अश्वगंधाचं दुधासोबत सेवन केल्यास अधिक चांगला लाभ होतो.
advertisement
डॉक्टर मनीष कुमार गहलोत सांगतात, की अश्वगंधाच्या सेवनामुळे अनेक प्रकारचे उपयोग होतात. अश्वगंधामुळे शरीराची ताकद वाढते. सांधेदुखीत आराम पडतो. रक्तदाब नियंत्रित राहतो. तणाव दूर करण्यासदेखील मदत होते. शरीर खूप थकलं असेल, तर अश्वगंधाचं सेवन केल्यानंतर शरीर सक्रिय होण्यास मदत होते.
advertisement
अश्वगंधा वनस्पतीचं मूळ पौष्टिक असतं. आरोग्य चांगलं करण्यासाठी आणि कामोत्तेजनेसाठीच्या औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो. संधिवात, तसंच म्हातारपणात बळ वाढवण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो. हे मूळ किंचित मादक, मूत्रवर्धक आणि रेचकही आहे. म्हणजेच ज्यांना लघवीशी निगडित किंवा पोटाशी निगडित काही समस्या असतील, त्यांच्यावर उपचारांसाठी याचा उपयोग होऊ शकतो. अश्वगंधाच्या विविध भागांपासून अश्वगंधा चूर्ण, अश्वगंधारिष्ट, अश्वधाघृत तैल, अश्वगंधा रसायन, अश्वगंधा घन वटी आदी औषधं तयार केली जातात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : अश्वगंधा वनस्पतीचे गुणधर्म वाचून तुम्हीही व्हाल थक्क, 'या' आजारांवर ठरते रामबाण
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement