कोरोना नेमका कुठून आला? अखेर 5 वर्षांनी समजलं, मिळाला ठोस पुरावा

Last Updated:

हा विषाणू 2019 च्या उत्तरार्धात चीनमधील बाजारपेठेतील संक्रमित प्राण्यांपासून माणसामध्ये आल्याचा एक मतप्रवाह संशोधकांमध्ये सुरुवातीपासून होता.

News18
News18
नवी दिल्ली : कोविड-19च्या उद्रेकाला सुरुवात होऊन आता जवळपास पाच वर्षे झाली आहेत. अजूनही हा विषाणू नेमका कुठून आला होता, हे आंतरराष्ट्रीय समुदायाला निश्चितपणे ठरवता आलेलं नाही. हा विषाणू 2019 च्या उत्तरार्धात चीनमधील बाजारपेठेतील संक्रमित प्राण्यांपासून माणसामध्ये आल्याचा एक मतप्रवाह संशोधकांमध्ये सुरुवातीपासून होता. गुरुवारी समोर आलेल्या नवीन पुराव्यांमुळे या सिद्धांताला बळ मिळालं आहे.
2019 च्या उत्तरार्धात चीनमधील वुहान शहरात कोविडची लागण झालेल्या व्यक्तींची सर्वात अगोदर नोंद झाली होती. पण, कोविड प्रादुर्भावाशी संबंधित असलेल्या दोन मुख्य सिद्धांतांच्या समर्थकांमध्ये वाद होते. काहींच्या मते, विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या वुहान लॅबमधून व्हायरस लीक झाला होता. तर काहींच्या मते, स्थानिक बाजारात विकल्या जात असलेल्या संक्रमित वन्य प्राण्यापासून माणसांमध्ये कोविड संक्रमित झाला होता. अनेक संशोधकांनी बाजारातून कोविडचा प्रवास सुरू झाल्याच्या मुद्द्याला पाठिंबा दिला होता.
advertisement
आता 'सेल' जर्नलमध्ये प्रकाशित झालेला नवीन अभ्यास वुहानमधील 'हुआनन सी-फूड मार्केट'मधून गोळा केलेल्या 800 हून अधिक नमुन्यांवर आधारित आहे. असं म्हटलं जात की, या मार्केटमध्ये वन्य सस्तन प्राणी देखील विक्रीसाठी ठेवले जात होते. जानेवारी 2020 मध्ये मार्केट बंद झाल्यानंतर हे नमुने गोळा करण्यात आले होते. प्राण्यांची विक्री करणाऱ्या स्टॉलमधील जमिनीवरून आणि तेथील गटारींमधून हे नमुने जमा केले गेले होते.
advertisement
अभ्यासाच्या सह-लेखिका आणि फ्रान्समधील सीएनआरएस संशोधन संस्थेतील इव्हॉल्युशनरी बायोलॉजिस्ट फ्लॉरेन्स डबार (Florence Debarre) एएफपीला म्हणाल्या, "चिनी अधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या अशा प्रकारच्या डेटावरून, मार्केटमधील प्राण्यांना संसर्ग झाला होता की नाही हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही. पण, आमच्या अभ्यासातून हे सिद्ध होतं की, 2019 च्या शेवटी या मार्केटमध्ये रॅकून डॉग आणि सिव्हेट सारख्या प्रजातींचे प्राणी होते. हे प्राणी मार्केटच्या नैऋत्य कोपऱ्यात होते. हे असं ठिकाण आहे, जिथे कोविड -19 ला कारणीभूत असणारे SARS-CoV-2 विषाणू आढळलेले आहेत."
advertisement
या लहान सस्तन प्राण्यांना माणसाप्रमाणे विषाणूंची लागण होऊ शकते. त्यामुळे, हे प्राणी माणूस आणि वटवाघुळं यांच्यातील मध्यवर्ती दुवा ठरल्याचा संशय आहे. त्यांच्या माध्यमातून SARS-CoV-2 ची उत्पत्ती झाल्याचा संशय आहे. काही फोटोग्राफिक पुरावे आणि 2021मध्ये अभ्यास झालेला असूनही, हुआनान मार्केटमध्ये या प्राण्यांची उपस्थिती याबाबत यापूर्वी वाद होता.
अभ्यासातील निष्कार्षांनुसार, एका स्टॉलमधील असंख्य वस्तूंवर COVID-19 साठी कारणीभूत असलेले विषाणू आढळले. प्राण्यांच्या गाड्या, एक पिंजरा, एक कचरा गाडी आणि केस/पंख काढण्याचे मशीन यांचा त्यात समावेश आहे. या नमुन्यांमध्ये माणसाच्या डीएनएपेक्षा सस्तन वन्यजीव प्रजातींचे डीएनए जास्त होते. पाम सिव्हेट्स, बांबू रॅट आणि रॅकून डॉग असलेल्या या स्टॉलमधील कोविड पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये सस्तन प्राण्यांचे डीएनए आढळले.
advertisement
मिळालेल्या डेटावरून असं सूचित होतं की, संबंधित स्टॉलमधील उपकरणांवर आढळलेला SARS-CoV-2 किंवा कोविड विषाणू एकतर तिथे असलेल्या प्राण्यांनी सोडलेला असावा किंवा नोंद न झालेल्या कोविड रुग्णांनी सोडलेला असावा. मार्केटमधील नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोविड विषाणूचा सर्वात अलीकडील पूर्वज हा अनुवांशिकदृष्ट्या मूळ स्ट्रेनसारखाच होता, याची देखील या संशोधनामुळे खात्री पटली आहे.
advertisement
फ्लोरेन्स डबार म्हणाल्या, "याचा अर्थ असा आहे की, विषाणूचे सुरुवातीचे विविध स्ट्रेन मार्केटमध्ये आढळले. जर विषाणूचं उगम स्थान मार्केटच असेल तर ही बाब स्वाभाविक आहे."
संशोधनात सहभागी नसलेले केंब्रिज युनिव्हर्सिटीतील इन्फेक्शिअस डिसिज विभागातील एपिडेमिलॉजिस्ट जेम्स वुड म्हणाले, "वुहानमधील हुआनान सी-फूड मार्केटमधील प्राण्यांचे स्टॉल्स हे कोविड-19 साथीच्या उद्रेकाचं हॉटस्पॉट असल्याचे अतिशय ठोस पुरावे या अभ्यासातून मिळतात. हे संशोधन महत्त्वाचं होतं. कारण पूर्वी होऊन गेलेल्या किंवा भविष्यातल्या संभाव्य महासाथींना चालना देण्यासाठी कारणीभूत असलेल्या अनेक बाबींना पायबंद घालण्यासाठी आतापर्यंत काहीच केलं गेलेलं नाही किंवा जे काही केलं गेलंय ते अगदीच नगण्य आहे. वन्यजीवांचा व्यापार, जैवविविधतेमध्ये घट किंवा जमिनीच्या वापरात झालेला बदल या बाबींचा त्यात समावेश आहे. सध्या अनेक देशांद्वारे एकमेकांशी शेअर केल्या जात असलेल्या महामारीच्या ड्राफ्ट्समध्ये या पैलूंचा समावेश नाही."
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कोरोना नेमका कुठून आला? अखेर 5 वर्षांनी समजलं, मिळाला ठोस पुरावा
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement