Exclusive: तिरुपतीच्या लाडूत खरंच प्राण्यांची चरबी? अखेर ठेकेदार कंपनीने News18 ला सांगितलं प्रसादात काय

Last Updated:

CNN News 18  ने तिरुपतीला लाडवांसाठी तूप पुरवणारा ठेकेदार कंपनीला याबाबत विचारलं. त्यांनी लाडवात नेमकं काय ते सांगितलं आहे.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
नवी दिल्ली : तिरुपतीला प्रसाद म्हणून मिळणार्‍या लाडवात प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा रिपोर्ट आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या बातमीने सगळ्यांना धक्का दिला.  दरम्यान CNN News 18  ने या लाडवांसाठी तूप पुरवणारा ठेकेदार कंपनीला याबाबत विचारलं. त्यांनी लाडवात नेमकं काय ते सांगितलं आहे.
वायएसआरसीपी सरकारच्या कार्यकाळात  कर्नाटक दूध महासंघाच्या 'नंदिनी' ब्रँडच्या तुपाच्या जागी खासगी कंत्राटदाराला तिरुपती लाडूसाठी तूप पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं. पुरवठादार बदलल्यानंतर लाडूंच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या.
सीएनएन न्यूज 18 ने तिरुपती मंदिराला तूप पुरवणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला. या कंपनीने सर्व आरोप फेटाळले आहेत.
कंपनीने सांगितलं, 'सर्व माहिती चुकीची आहे. या सर्व अफवा आहेत. कोणीही कोणावरही आरोप करू शकतो, याचा पुरावा काय आहे? कोणी काहीही म्हणेल याचा अर्थ असा नाही की ते सत्य आहे. कोणीही कोणावरही आरोप करू शकतो, अहवाल कोणीही तयार करू शकतो'
advertisement
'आम्ही फक्त दूध वापरत आहोत. ते 100 टक्के गायीचं दूध आहे. आमच्याकडे सर्व आवश्यक लॅब रिपोर्ट्स आहेत', असं कंपनी म्हणाली.
रिपोर्टमध्ये काय म्हटलं आहे?
सेंटर ऑफ ॲनालिसिस अँड लर्निंग इन लाइव्हस्टॉक अँड फूड, किंवा CALF, गुजरातच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात YSRCP सत्तेत असताना प्रसिद्ध तिरुपती लाडू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीची उपस्थिती उघड झाली. अहवालात असे सूचित केले आहे की तुपात फिश ऑइल, बीफ टॉलो आणि लार्डचे अंश आहेत; तसेच त्यात अर्ध-घन पांढरे चरबी उत्पादन आहे जे डुकराच्या फॅटी टिश्यूचे प्रस्तुतीकरण करून प्राप्त होते, त्याचा वापर देखील केला गेला आहे.
advertisement
वायएसआरसीपीने फेटाळला दावा 
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आरोप केला की, मागील वायएसआरसीपी सरकारच्या काळात प्रसिद्ध तिरुपती लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरली गेली. मात्र वायएसआरसीपीने हा दावा फेटाळून लावला आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Exclusive: तिरुपतीच्या लाडूत खरंच प्राण्यांची चरबी? अखेर ठेकेदार कंपनीने News18 ला सांगितलं प्रसादात काय
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement