मुरुम, ब्लॅकहेड्सनी त्रस्त आहात? तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी करा 'हे' उपाय, चेहरा होईल चमकदार!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
ऑयली स्किनमुळे पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्ससारख्या समस्या वाढतात. यामुळे त्वचेची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दिवसभर जमा झालेले तेल...
मुरुम, व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्सच्या समस्येने तेलकट त्वचा असलेले लोक खूप त्रस्त असतात. याचे कारण म्हणजे, तेलकट त्वचेतील सेबेशियस ग्रंथी सामान्य त्वचेपेक्षा जास्त सक्रिय असतात. जास्त तेलामुळे त्वचेत घाण आणि धूळ साचते, ज्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होण्याची शक्यता असते. यामुळे मुरुम, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सची समस्या नेहमीच राहते. त्यामुळे तुमचीही त्वचा तेलकट असेल, तर तिची काळजी अशा प्रकारे घ्या.
सनस्क्रीन लावण्यास विसरू नका
हवामान कोणतेही असो, घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावण्यास विसरू नका. SPF 30 असलेले सनस्क्रीन खूप चांगले असते. ते मुरुम येण्यापासून रोखण्यास मदत करते.
व्यायामानंतर त्वचा स्वच्छ करा
व्यायामानंतर आंघोळ करण्याइतकेच चेहरा स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. चेहरा धुतल्याने घामासोबतच व्यायामादरम्यान जमा झालेले तेल आणि घाण दूर होते. सामान्य फेसवॉशने चेहरा धुवा आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावा.
advertisement
जास्तीचे तेल काढत राहा
चेहऱ्यावर दिसणारे जास्तीचे तेल काढण्यासाठी ब्लॉटिंग पेपरचा वापर करा. यासाठी ब्लॉटिंग पेपर चेहऱ्यावर काही सेकंद हलका दाबून ठेवा. यामुळे जास्तीचे तेल शोषले जाते.
योग्य उत्पादने निवडा
तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी त्वचेची काळजी घेणारी उत्पादने (skin care products) खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी. तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये कोणत्याही अल्कोहोल-आधारित उत्पादनाचा समावेश करू नका. याशिवाय, कोको बटर, शिया बटर आणि व्हॅसलीन यांसारखी उत्पादनेही टाळावीत.
advertisement
इतर महत्त्वाच्या गोष्टी
- सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करावा.
- सॅलिसिलिक ऍसिड, ग्लायकोलिक ऍसिड किंवा लॅक्टिक ऍसिड असलेले टोनर वापरा.
- बेंझोइल पेरोक्साइड किंवा रेटिनॉलने तुमच्या त्वचेवर उपचार करा.
- सकाळी आणि रात्री हलक्या मॉइश्चरायझरने त्वचेला ओलावा द्या.
हे ही वाचा : Skin care routine steps: त्वचेची खास काळजी घ्या! फाॅलो करा 'ही' 6 स्टेप्सची रुटीन, चेहऱ्यावर येईल नवी चमक!
advertisement
हे ही वाचा : Oily skin care routine: चेहरा सतत तेलकट दिसतो? करा 'हे' 5 सोपे उपाय, त्वचा राहील फ्रेश आणि सुंदर!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 26, 2025 5:20 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मुरुम, ब्लॅकहेड्सनी त्रस्त आहात? तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी करा 'हे' उपाय, चेहरा होईल चमकदार!


