जगभरातील सुगंधाचा इथं संपेल शोध, पाहा कसा आहे पुण्यातला पहिला ‘परफ्युमर बार’
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पुणे शहरात आता चक्क परफ्युम बार सुरू झालंय. कसा आहे हा बार? पाहूया
पुणे, 26 सप्टेंबर : व्यक्तिमत्वाची भुरळ पाडण्यासाठी तसेच दररोजच्या जीवनात एक प्रसन्न देहबोली राखण्यासाठी परफ्युमचा वापर जातो. अनेकजण परफ्यूम्सच्या नवनवीन व्हरायटीजच्या शोधात असतात. काहीजणांचे स्वतः चे खास कलेक्शनसुद्धा असते. परंतु बऱ्याचदा महागड्या ब्रॅंड्सचे परफ्युम्स घेणे बजेटअभावी परवडत नाही. पुण्यातील परफ्युम ग्राहकांची हीच चिंता आता मिटणार आहे.
मोठ्या एक्स्पेन्सिव्ह ब्रॅंड्सचे परफ्यूम्ससुद्धा अगदी पॉकेट फ्रेंडली दरात मिळू शकणार आहेत. प्रतीक शेमलानी यांनी 'परफ्युम बार' ही कन्सेप्ट असलेले पुण्यातील पहिलेवहिले शॉप सुरू केले आहे. या ठिकाणी ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या ब्रँड आणि सुवासाचे परफ्युम्स लाईव्ह बनवून दिले जातात. त्यांच्या गरजेनुसार पर्सनलाईज करण्याची व्यवस्थासुद्धा इथं उपलब्ध आहे.
advertisement
कसं आहे परफ्युम बार?
पुण्यातील प्रतीक शेमलानी यांनी दुबईमध्ये 'परफ्युम बार'ची कन्सेप्ट पाहिली होती. त्यावरून प्रेरणा घेऊन त्यांनी असे शॉप पुण्यात सुरू करायचे ठरवले. शॉप सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांना ग्राहकांचा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. इथे ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या ब्रँडचे परफ्युम खिशाला परवडतील अशा दरात मिळतात.
जे परफ्यूम्स घ्यायला ग्राहकांना परवडत नाहीत अशा एक्स्पेन्सिव्ह परफ्युम्सचे क्लोन्स तयार केले जातात. त्यानंतर त्यांची 'फ्रेग्रन्स प्रोफाइल' मॅच केली जाते. ही प्रोफाइल 85%-90% मॅच होते आणि परफ्युम तयार होतो. काही वेळा ही 'फ्रेग्रन्स प्रोफाइल' मॅच करायला आठ ते दहा दिवसांचा वेळसुद्धा लागतो, असं शॉपचे मालक प्रतीक यांनी सांगितलं.
advertisement
या शॉपमध्ये 200 ते 250 प्रकारचे जगभरातील वेगवेगळ्या ब्रॅंड्सचे परफ्यूम्स उपलब्ध आहेत. कस्टमाइज आणि पर्सनलाईज परफ्युम्सची प्राईज रेंज 500 रुपयांपासून ते 4000 रुपयांपर्यंत आहे. तसेच इतर परफ्युम्सची किंमत 360 रुपयांपासून सुरू आहे. तुम्हालाही जर वर्ल्ड फेमस महागड्या ब्रँडचे परफ्यूम्स माफक दरात मिळवायचे असेल तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 26, 2023 2:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
जगभरातील सुगंधाचा इथं संपेल शोध, पाहा कसा आहे पुण्यातला पहिला ‘परफ्युमर बार’