Amla Juice Benefits: गुणकारी आवळ्याचे आहेत इतके फायदे; 30 दिवस प्या आवळ्याचा रस दूर होतील अनेक आजार
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Amla Juice Health Benefits in Marathi: आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला आतून बळकट करतात. सलग 30 दिवस आवळ्याचा रस प्यायल्याने अनेक आजारांना दूर ठेवता येतं.
Amla Juice Health Benefits: आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि इतर अनेक आवश्यक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला आतून बळकट करतात. सलग 30 दिवस आवळ्याचा रस प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल, पचनक्रिया सुधारेल होईल आणि त्याच वेळी त्वचा आणि केसांनाही खूप फायदा होईल. 30 दिवस दररोज आवळ्याचा रस प्यायल्याने कोणते फायदे होतील ते जाणून घेऊया.
डायबिटीस येणार नियंत्रणात
आवळ्याचे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म केवळ इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवत नाहीत तर स्थूलपणा कमी करायला मदत करतात जे अनेकदा टाईप 2 मधुमेहाचं कारण ठरतं. याशिवाय आवळ्यामध्ये असलेलं क्रोमियम हे शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. 30 दिवस आवळ्याचा दररोज हे प्यायल्याने तुमच्या आरोग्यामध्येही सुधारणा दिसून येईल.
advertisement

वजन कमी होण्यास मिळणार मदत
जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आवळ्याचा रस तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. सलग 30 दिवस रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने फक्त वजन कमी होण्यास मदत होणार नाही तर एकूणच आरोग्यात सुधारणा दिसून येईल. आवळ्यात असलेल्या फायबर्समुळे पचन सुधारतं. याशिवाय पोट बराच काळ भरलेलं राहतं, ज्यामुळे कमी भूक लागते. याव्यतिरिक्त, आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराचे मुक्त रॅडिकल्सच्या हानीपासून संरक्षण करतात आणि त्वचेला निरोगी ठेवतात.
advertisement
बॅड कोलेस्टेरॉल होणार कमी
सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. आवळ्याचा रस नियमितपणे प्यायल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. इतकेच नाही तर आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स देखील हृदयविकाराचा धोका कमी करतात.
advertisement
रोगप्रतिकार शक्ती वाढणार
दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आवळा हा जीवनसत्व सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे जे शरीराला संसर्गाविरूद्ध लढण्यास मदत करतात. या पोषकतत्त्वांमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होऊ शकते.
advertisement
पचन सुधारून गॅसेसचा त्रास कमी होणार
आवळ्याच्या रसात असलेल्या फायबर्समुळे पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅसेस सारख्या आजारांना दूर ठेवता येऊ शकतं. जर तुम्ही दररोज 30 दिवस रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायलात, तर तुम्ही पचनाच्या अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांना दूर ठेऊ शकता.
याशिवाय 30 दिवस दररोज आवळ्याचा रस प्यायल्याने तुमची त्वचा देखील निरोगी राहील, विशेषतः जर तुम्हाला मुरुमांची समस्या असेल तर ती सुद्धा नाहीशी होईल. याशिवाय केस गळतीचा त्रास असलेल्या लोकांसाठी आवळ्याचा रस गुणकारी आहे. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि त्यांची वाढ होते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2024 1:18 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Amla Juice Benefits: गुणकारी आवळ्याचे आहेत इतके फायदे; 30 दिवस प्या आवळ्याचा रस दूर होतील अनेक आजार