पुणेकरांनो, तुमच्या घराची बनावट चावी इतर कोणाकडे तर नाही ना? पिंपरीतील ती घटना वाचून बसेल धक्का
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
घर बंद करून कामावर जाताना आपण कुलूप लावतो आणि सुरक्षित असल्याची खात्री बाळगतो. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील थेरगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे
पुणे : घर बंद करून कामावर जाताना आपण कुलूप लावतो आणि सुरक्षित असल्याची खात्री बाळगतो. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील थेरगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्याने घराचे कुलूप न तोडता, चक्क बनावट चावीचा वापर करून घर उघडले आणि सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे घरमालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, तुमच्या घराच्या चाव्यांबाबत तुम्ही किती सतर्क आहात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भरदिवसा घरात 'लुटमार'
ही घटना शुक्रवारी (दि. ६ फेब्रुवारी) थेरगावमधील कैलासनगर परिसरात घडली. फिर्यादी देव विजय लोट (वय १९) हे नेहमीप्रमाणे सकाळी घराला कुलूप लावून कामासाठी बाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने बनावट चावीच्या साहाय्याने कुलूप उघडले आणि घरात प्रवेश केला. कपाटातील ७ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि ३० हजार रुपयांची रोकड, असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा माल चोरट्याने शिताफीने लांबवला.
advertisement
ओळखीच्याच व्यक्तीवर संशय?
साधारणपणे घरफोडी करताना कुलूप तोडले जाते किंवा कडी उचकटली जाते. मात्र, येथे बनावट चावीचा वापर झाल्याने हे काम एखाद्या जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीचे असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. याप्रकरणी राहुल हरीश हरिजन ऊर्फ लोट (वय २६, रा. थेरगाव, मूळ रा. राजस्थान) याच्यावर संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे काळेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. काळेवाडी पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, बनावट चावी कशी बनवण्यात आली याचा शोध घेत आहेत. पुणेकरांनो, आपल्या घराची चावी कोणा अनोळखी व्यक्तीकडे किंवा सुरक्षित नसलेल्या ठिकाणी ठेवणे किती महागात पडू शकते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 8:22 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो, तुमच्या घराची बनावट चावी इतर कोणाकडे तर नाही ना? पिंपरीतील ती घटना वाचून बसेल धक्का









