वाळवा जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : वाळ्यातील विजयी उमेदवारांची यादी, जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात कोण जिंकलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Walwa ZP Election Result 2026 : जयंत पाटील यांच्याविरोधात महायुती एकवटल्याचं चित्र पहायला मिळत आहे. मिनी मंत्रालयाच्या लढतीला चुरस निर्माण झाली आहे.
Walwa ZP Election Result : वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व 11 जागांवर चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या तालुक्यात एकूण 11 जिल्हा परिषद गट असून त्यात चिकुर्डे, वाटेगाव, येलूर आणि कामेरी यांसारख्या मोठ्या गटांचा समावेश होता. चिकुर्डे गटामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अभिजित पाटील मैदानात असून त्यांच्याविरोधात भाजपचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील उभे होते. ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती, कारण दोन्ही बाजूने तगडी रसद पुरवली जात आहे. मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा कोण घेणार, याची चर्चा सध्या वाळव्यात रंगली होती.
येलूर गटात देखील असाच हायव्होल्टेज सामना पाहायला मिळत असून तिथे सम्राट महाडिक यांची भावजय हर्षदा राहुल महाडिक भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने देविका राजेघोरपडे यांना उमेदवारी दिली होती. घोरपडे आणि महाडिक या दोन मातब्बर घराण्यांमधील हा संघर्ष तालुक्यात चर्चेचा विषय ठरला होता.
कामेरी गटात तर एकेकाळचे मित्र आता एकमेकांसमोर उभे ठाकले होते. जयराज पाटील आणि माजी उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्यातील ही लढाई पूर्णपणे व्यक्तिगत प्रतिष्ठेची बनली. वाळवा तालुक्यातील 11 गट आणि 22 गणांचा निकालावर संपूर्ण सांगली जिल्ह्याचे राजकीय भविष्य ठरलं आहे.
advertisement
advertisement
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 8:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
वाळवा जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : वाळ्यातील विजयी उमेदवारांची यादी, जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात कोण जिंकलं?









