2 आठवड्यांसाठी सोडा साखर; होतील 'इतके' फायदे की विश्वास बसणार नाही

Last Updated:

2 आठवड्यांसाठी तुम्ही साखर खाणं सोडलं तर पचन सुधारण्यापासून ते त्वचा उचळून निघेपर्यंत अनेक फायदे दिसून येतील.

News18
News18
No Sugar For 2 Weeks: वाढतं वजन अनेकांसाठी डोकेदुखीचं ठरू लागलंय. त्याचं कारण म्हणजे सर्रासपणे खाल्लं जाणारं जंकफूड. धकाधकीच्या जीवनात आपण पौष्टिक अन्नापेक्षा चविष्ठ अन्नाला आपण महत्व देऊ लागलो आहोत. त्यामुळे लाईफस्टाईल डिसीजची मगरमिठी आपल्या भोवती पडू लागली आहे. वाढलेलं  वजन कमी करण्यासाठी गोड कमी खाण्याचा किंवा साखरेचं प्रमाण कमी करण्याचा सल्ला सल्ला डॉक्टर आपल्याला देतात. जर
बरेच आरोग्य तज्ज्ञ मर्यादित प्रमाणात साखर न खाण्याची किंवा साखर पूर्णपणे सोडून देण्याची शिफारस करतात. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीये. ते सांगतात फक्त 14 दिवस साखर खायची सोडली तर शरीरात अनेक आश्चर्यकारक बदल दिसून येऊ शकतात.
advertisement
पचनक्रिया, पोटाचं आरोग्य सुधारतं
डॉक्टर सेठी म्हणतात, तुम्ही 2 आठवडे साखर खाल्ली नाही तर तुमच्या आतड्यांचं आरोग्य सुधारतं कारण आतड्यातले निरोगी बॅक्टेरिया पुनर्संचयित होतात, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि चयापचय क्रिया चांगली होऊन अन्न पचायला मदत होते.
चेहरा उजळतो
14 दिवस साखर न खाल्याचे चांगले आणि दूरगामी परिणाम दिसून येतात. सर्वात मोठा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येईल. कारण, दोन आठवडे साखर न खाल्ल्याने शरीरातले अतिरीक्त फॅट्स बर्न होतात. चेहऱ्यावरचे फॅट्स कमी झाल्याने चेहराचा गोल आकारा जाऊन नैसर्गिक आकारात येऊ शकतो.
advertisement
advertisement
डोळ्यांची सूज कमी होते
जर तुम्ही साखर सोडली तर ते तुमच्या डोळ्यांभोवती येणारा फुगीरपणा आणि द्रव टिकवून ठेवण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे डोळे कमी सुजलेले दिसतात.
त्वचेच्या समस्या दूर होतील
जर, मुरुमं किंवा लाल डागांची समस्या असेल, तर दोन आठवडे साखर न खाल्ल्याने तुम्ही मुरुम किंवा लाल डागांच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता आणि तुमची त्वचा पूर्वीपेक्षा अधिक उजळ आणि स्वच्छ दिसते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
2 आठवड्यांसाठी सोडा साखर; होतील 'इतके' फायदे की विश्वास बसणार नाही
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement